Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : पाण्याअभावी रणरणत्या उन्हात भटकंती; ग्रामस्थांचे पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन

Beed Majalgaon News : माजलगाव तालुक्यातील टाकरवन या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत काम चालू आहे. मात्र काम अत्यंत संथगतीने व निकृष्ट दर्जेचे होत असल्यामुळे आज टाकरवनकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: पाणीटंचाईची समस्या सगळीकडे भेडसावत आहे. हीच परिस्थिती माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे निर्माण झाली आहे. जलजीवन मिशन योजनेसाठी पाच कोटी रुपये खर्च करूनही टाकरवनमध्ये पाणी आलेच नाही. परिणामी ग्रामस्थांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान पाण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचातीसमोर आंदोलन केल्याने प्रशासनाला जाग आली आहे. 

बीडच्या माजलगांव तालुक्यातील टाकरवन ग्रामपंचायत समोर कपिल आढागळे यांच्यासह ग्रामस्थांनी पाणी प्रश्नावर धरणे आंदोलन सुरु केले आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवन या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत काम चालू आहे. मात्र काम अत्यंत संथगतीने व निकृष्ट दर्जेचे होत असल्यामुळे आज टाकरवनकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. समस्त ग्रामस्थसह कपिल आडगळे ह्यांनी टाकरवन ग्रामपंचायत समोर पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावून जल जिवनचे निकृष्ट दर्जाचे होणारे काम चांगले करण्यात या मागणीसाठी धरणे आंदोलन चालू केले आहे.

पाण्यासाठी उन्हात भटकंती 

माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे जलजीवन योजनेकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. एवढा निधी खर्च होऊन देखील गावाला पाणी मिळालेली नाही. योजना पूर्ण करताना कंत्राटदाराने मनमानी केली आणि काही त्रुटी ठेवल्या. यामुळे आता भरउन्हाळ्यात टाकरवनकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. या योजनेच्या कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आले.  

प्रशासनाला आली जाग 

जलजीवन योजना राबवून देखील गावात पाणी नसल्याने नागरिक संतप्त झाले. यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आला असून आता अधिकाऱ्यांनी योजनेची चौकशी करून काम पूर्ण करण्याची आश्वासन देण्यात आले आहे. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. तरी आता उन्हाळ्यात टाकरवनकरांना मात्र पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT