Gulabrao Patil : अजित पवारांना 'त्या' निर्णयाचा पश्चाताप येणार; मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा

Jalgaon News : शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गुलाबराव देवकर यांना अजित पवार यांनी पक्षात घेतले. त्यामुळे पाटील यांनी देवकर यांच्यासह अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो, तेव्हा आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना अजित पवार यांनी सोबत घेतले. आमची इच्छा नसतानाही त्या सर्वांना पक्षात घेतलं. या निर्णयाचा अजित पवार यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे जळगावातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गुलाबराव देवकर यांना अजित पवार यांनी पक्षात घेतले आहे. त्यामुळे पाटील यांनी देवकर यांच्यासह थेट अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. यामुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलणार कि तापणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. 

Jalgaon News
Palghar : रेल्वे प्रवासात महिलेवर हल्ला; क्षुल्लक कारणातुन झालेल्या वादातून केला शस्त्राने वार

एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती 
अजित पवार यांनी देवकर यांना पक्षात घेण्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा चर्चा करायला हवी होती. खरंच महायुतीचे हे धोरण आहे का? देवकर यांच्या जेव्हा शंभर गोष्टी बाहेर येतील, तेव्हा अजित पवारही म्हणतील की गुलाबराव पाटील खरं म्हणत होते. भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्यासाठी देवकर अजित पवारांच्या पक्षात गेले आहेत. पण गुलाबराव पाटील ही घाण साफ होऊ देणार नाही. खरं काय ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही; असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

Jalgaon News
Akole News : राजूरमध्ये काविळचे थैमान सुरूच; २५० च्यावर पोहचली रुग्ण संख्या

आता तुम्ही ओके झाले का?
गुलाबराव पाटील म्हणाले, कि अजित पवार यांच्यावर देवकर यांनी कायम टीका केल्या आहेत. अजित दादांना ज्यांनी काळे झेंडे दाखविले. त्याच देवकरांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतलं आहे. हेच गुलाबराव देवकर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो; तेव्हा आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके म्हणत होते. मग ते अजित पवार यांच्या पक्षात येऊन आता ओके झाले काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com