Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; भररस्त्यात आई आणि मुलाला बेदम मारलं, नेमकं काय घडलं?

Beed Kej News : बीडच्या केज तालुक्यात जमिनीच्या किरकोळ वादातून गावगुंडांनी महिलेला व तिच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण केली. महिला गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या निष्क्रीयतेवर नागरिकांची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • केज तालुक्यात महिलेला व मुलाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली

  • जमिनीच्या शुल्लक वादातून घटना घडल्याचे प्राथमिक माहिती

  • महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

  • पोलिस निष्क्रीयतेवर नागरिक व पीडित कुटुंबाचा संताप

जमिनीच्या किरकोळवादातून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगावी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडानी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण केली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.अमानुष मारण्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबाने केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथे एका महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. जमिनीच्या शुल्लक वादातून ही मारहाण करण्यात आली असून या आधी या गाव गुंडांच्या विरोधात ५ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र तक्रार का नोंदवली म्हणत गाव गुंडांनी महिलेची व तिच्या मुलाची रस्त्यात वाट अडवत मारहाण केली.

या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महिलेने म्हटलं आहे की, या आधी पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवून घेतली मात्र आरोपीवर कारवाई केली असती, तर पुन्हा ही अशी घटना घडली नसती. तसेच संबंधित महिलेच्या जीवाला धोका असल्याचंही तिने म्हटलं आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता केज पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. यापूर्वीच आरोपींना समज दिली असती कारवाई केली असती तर अशी घटना घडली नसती. असा संताप पीडितेने व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये मोठं घबाड, SIT च्या हाती लागले महत्वाचे पुरावे, VIDEO

Maharashtra Live News Update: बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ हवामानसह मेघगर्जना

Shocking : बाई, काय हा प्रकार... पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी तरुणाने देवीला घातलं साकडं; नवस पूर्ण होताच काय केलं? वाचा

Maharashtra Politics: अकोल्यात मोठी राजकीय घडामोड, १६ नगरसेवकांचे तडकाफडकी निलंबन; कारण आलं समोर

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका; नाशिकमध्ये गहू पिकाचे मोठे नुकसान|VIDEO

SCROLL FOR NEXT