TMKOC Actor : आधी अंजली, नंतर गोली; आता 'हा' मोठा कलाकाराचा तारक मेहता का उल्टा चष्माला रामराम ठोकणार, कारण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Prajakta Shisode : तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील 'सुनीता' म्हणजेच प्राजक्ता शिसोदेने अपमानाचा आरोप करत शो सोडला. चाहत्यांमध्ये नाराजी तर निर्मात्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह.
TMKOC Actor : आधी अंजली, नंतर गोली; आता 'हा' मोठा कलाकाराचा तारक मेहता का उल्टा चष्माला रामराम ठोकणार, कारण...
Taarak Mehta Ka Ulta Chashma Prajakta ShisodeSaam Tv
Published On
Summary
  • 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून प्राजक्ता शिसोदेची एक्झिट

  • अपमानाचा गंभीर आरोप सोशल मीडियावर

  • चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

  • मालिकेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर

"तारक मेहता का उल्टा चष्मा" हा शो गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचा आवडता आहे. ही मालिका त्याच्या कथानकासह तिच्या पात्रांमुळेही चर्चेत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या मालिकेबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत. एकामागून एक अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे. अनेकांनी असित मोदींवर गंभीर आरोपही केले आहेत. दरम्यान आणखी एका अभिनेत्रीने या शो ला रामराम केला आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शो मधील गोकुळधाम सोसायटीमध्ये भाजीपाला विकताना दिसणारी सुनीता म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे हीने सोशल मीडियावर पोस्ट करत मालिका सोडली असल्याचं म्हटलं आहे. शिवाय पोस्ट खाली कॅप्शनमध्ये लिहत तिने म्हटलं आहे की, झालेल्या अपमानामुळे तिने ही मालिका सोडली आहे.

TMKOC Actor : आधी अंजली, नंतर गोली; आता 'हा' मोठा कलाकाराचा तारक मेहता का उल्टा चष्माला रामराम ठोकणार, कारण...
Right To Disconnect 2025 Act : "कर्मचाऱ्यांना ऑफीसनंतर नो कॉल, नो ईमेल" संसदेत विधेयक मांडलं; वाचा सविस्तर

काय आहे प्राजक्ताची पोस्ट?

प्राजक्ताने इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि तिच्या पात्राचा फोटो शेअर करत खुलासा केला की ती आता "तारक मेहता" चा भाग नाही. प्राजक्ताने लिहिले की , "तुम्ही अशा लोकांसोबत काम करू नये जे तुमच्या भावनांचा आदर करत नाहीत. मला दिलेल्या सुनीताच्या या भूमिकेसाठी तारक मेहता का उल्टा चष्माचे आभार. मला माझ्या महिला मंडळाच्या टीमची नेहमी आठवण येईल."

प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनीही भरभरून कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, आम्ही तुम्हाला मिस करू. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की आमच्या आवडत्या शो मध्ये आम्हाला सुनीताची नेहमीच कमी जाणवेल. अशा प्रकारच्या संमिश्र कमेंट चाहते करत आहेत. प्राजक्ताचे जाणे हा शोसाठी आणखी एक मोठा धक्का आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com