Kalamb Ambajogai highway bike accident Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Accident : आजारी नातेवाईकाला बघून परतताना आक्रित घडलं, भरधाव पिकअपची जोरदार धडक; दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Beed Bike Accident : बीडमध्ये आज गुपारी तीन वाजेच्या सुमारास कळंब-अंबाजोगाई महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : बीडमधील कळंब-अंबाजोगाई महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. सावळेश्वर आणि औरंगपूर शिवाराच्या सीमेवर आज बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या दरम्यान भरधाव पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन वीटभट्टी कामगार जागीच ठार झाले. सुभाष आश्रुबा मोहिते (वय ५०) आणि सुनिल भीमराव पवार (वय ४०, दोघेही रा बार्शी, ह.मु.सातेफळ, वीटभट्टी, अंबाजोगाई) अशी मृतांची नावे आहेत.

बार्शी येथील काही कामगार अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ येथील वीटभट्टीवर काम करतात. नातेवाईक आजारी असल्यामुळे येथील सुभाष आश्रुबा मोहिते आणि सुनिल भीमराव पवार हे दोन कामगार दुचाकीवरून क्रमांक एमएच २५ एबी ४१९८ बार्शीला गेले होते. बुधवारी दोघेही परत सातेफळकडे निघाले. यावेळी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सावळेश्वर आणि औरंगपूर शिवाराच्या सीमेवर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव पिकअकने क्रमांक एमएच २० जीसी २१०८ जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस कर्मचारी सीताराम डोंगरे, गणेश राऊत, महादेव केदार, रामनाथ वारे यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सांगलीत बाईक अन् डंपरचा भीषण अपघात

दरम्यान, सांगलीमध्ये देखील एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वडिलांसह दोन मुलांचा यात मृत्यू झाला आहे, तर आई गंभीर जखमी आहे. इस्लामपूर-आष्टा रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. अश्फाक पटेल (वय ३९), अशरफ पटेल (वय १२) आणि असद पटेल (वय १०) असं ठार झालेल्या बाप लेकांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT