Disha Salian: दिशा सालियनच्या शरीरावर जखमांचा खुणा, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर, VIDEO

Shocking Details in Disha Salian’s Post-Mortem Report: तब्बल पाच वर्षांनी दिशा सालियान प्रकरण हे पुन्हा नेत्यांनी उपसले आहे, अशातच दिशा सालियानचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिशा सालियान प्रकरणावरून राज्याचे राजकारण उन्हाच्या तापमानापेक्षा जास्त तापले आहे, मागच्या दोन दिवसांपासून विधानसभेमध्ये हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. नितेश राणे यांनी तर थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहे. अशातच दिशा सालियनचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये दिशाच्या छातीवर आणि पोटावर खरचटल्याच्या जखमा आहेत. तसंच तिच्या हात, पाय आणि शरीरावर काही ठिकाणी जखमा असल्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला होता. मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी दिशाने आत्महत्या केल्याचे दावा केला होता. यानंतर आता तिचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com