Beed Road Issue Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: अरेच्चा! रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळेना, अखेर तरुणीने स्कुटी थांबवली अन्...

Beed Marathi News: खड्डेमय आणि चिखलमय रस्त्याने बीडकरांचे हाल...

विनोद जिरे

Beed News: आतापर्यंत आपण खड्डा चुकवताना एखादा अपघात झालेला पाहिला असेल मात्र बीडमध्ये खड्डा चुकवनं मुश्कील झाल्याने, चक्क एका तरुणीला आपली स्कुटी हातात घेऊन जाण्याची वेळ आली. बीड शहरातील नगर नाका चौकात, गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. यावरून जाताना, खड्डा चुकवनं मुश्किल असल्याचं पाहून, स्कुटीवरील तरुणी आपली स्कुटी हातात घेऊन पायी गेली.

विशेष म्हणजे या खड्डेमय आणि चिखलमय झालेल्या रस्त्यावर अनेक अपघात (Accident) होतात. मात्र हा रस्ता ज्या बांधकाम विभागाकडे येतो, त्या बांधकाम विभागाचे कार्यालय आणि लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला, या महामार्गालगत असतांना देखील अधिकारी आणि आमदार केवळ बघ्याची भूमिका घेतात.

त्यामुळं या अधिकारी आणि लोकप्रतिनिधीविषयी बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल, किमान या रस्त्यांवरील खड्डे तरी तात्काळ बुजवण्याची सदबुद्दी या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

First car service: नवी कार घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग कधी केली पाहिजे?

SCROLL FOR NEXT