प्रमोद जगताप, प्रतिनिधी...
मणिपूर हिंसाचाराने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ज्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session) उमटताना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी मोदी सरकारकडून मणिपूर मुद्दावर चर्चा करण्यास तयारी दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळेच विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती. या मागणीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी दिली आहे.
लोकसभेत विरोधक आक्रमक...
मणिपूरमधील दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओवरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून संसदेतही वातावरण अधिकच तापलं असून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेमध्ये निवेदन करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.
अविश्वास ठराव मंजूर..
संतप्त झालेल्या विरोधकांनी आज लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस अध्यक्षांकडे दिली आहे. आता या अविश्वास ठरवाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर निवदेन देतील, अशी आशा विरोधकांना आहे.
केंद्रसरकारला धोका नाही..
दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीएचं संख्याबळ बहुमतापेक्षाही खूप जास्त आहे. त्यामुळे अविश्वास ठराव मांडला तरी त्याचा निकाल हा सरकारच्याच बाजूने लागणार आहे. मात्र, तरीही विरोधकांनी हा ठराव मांडण्याची नोटीस दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.