Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

Shreya Maskar

मुंबई

तुम्ही जर पहिल्यांदा मुंबईला आला असाल किंवा एका दिवसात तुम्हाला मंबईचे दर्शन घ्यायचे असेल तर ही ७ ठिकाणे नक्की पाहा. येथील सौंदर्य कायम मनात घर करून राहील.

Mumbai | pinterest

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया म्हणजे मुंबईची ऐतिहासिक ओळख असलेली भव्य कमान आणि समुद्राचे सुंदर दृश्य. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.

Gateway of India | pinterest

मरीन ड्राइव्ह

समुद्रकिनाऱ्यालगत फेरफटका मारण्यासाठी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण. तसेच येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेता येतो.

Marine Drive | pinterest

श्री सिद्धिविनायक मंदिर

मुंबईला आल्यावर श्री सिद्धिविनायक मंदिरात गणपतीच्या दर्शनाला जायलाच पाहिजे. येथे तुम्हाला शांत आणि मंत्रमुग्ध करणार वातावरण अनुभवता येईल.

Sri Siddhivinayak Temple | pinterest

एलिफंटा लेणी

प्राचीन दगडी शिल्पकला आणि ऐतिहासिक वारशासाठी एलिफंटा लेणी प्रसिद्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया येथून फेरीने जाता येते.

Elephanta Caves | pinterest

हँगिंग गार्डन

मुंबईतील मलबार हिल येथील कमला नेहरू पार्क मध्ये प्रसिद्ध 'म्हातारीचा बूट' आहे. हे ठिकाण हँगिंग गार्डन म्हणूनही ओळखले जाते.

The Hanging Garden | pinterest

इतर ठिकाणे

तुम्ही मुंबईला गेल्यावर जुहू बीच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बांद्रा किल्ला, गिरगाव चौपाटीला नक्की भेट द्या.

other places | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : कुठे गुलाबी तलाव, तर कुठे आरशासारखे वाळवंट; जगातील 'ही' ७ अनोखी ठिकाणे पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

World Unique Places | AI PHOTO
येथे क्लिक करा...