World Unique Places : कुठे गुलाबी तलाव, तर कुठे आरशासारखे वाळवंट; जगातील 'ही' ७ अनोखी ठिकाणे पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Shreya Maskar

जग

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी एखाद्या परीकथेतील गावासारखी, दुसऱ्या ग्रहावरील प्रदेशासारखी किंवा निसर्गाच्या चमत्कारासारखी दिसतात. त्यांचीच आज माहिती करून घेऊयात.

world | pinterest

गीथूर्न

नेदरलँड्स मधील गीथूर्न हे ठिकाण कालव्यांचे सुंदर गाव म्हणून प्रसिद्ध आहे. रस्त्यांऐवजी कालवे, लहान बोटी आणि गवताच्या छपरांची घरे यांमुळे हे गाव एखाद्या परीकथेतील ठिकाणासारखे दिसते.

Giethoorn | pinterest

सलार दे उयुनी

बोलिव्हिया येथे सलार दे उयुनी हे ठिकाण आहे. जगातील सर्वांत मोठ्या मिठाच्या मैदानावर पावसानंतर पाण्याचा पातळ थर तयार झाला की आकाशाचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे संपूर्ण परिसर आरशासारखा भासतो.

Salar de Uyuni | pinterest

लेक हिलियर

ऑस्ट्रेलियातील लेक हिलियर गुलाबी रंगाचा तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्राच्या निळ्या पाण्याच्या आणि हिरव्या वनस्पतींच्या पार्श्वभूमीवर दिसणारा गुलाबी तलाव या ठिकाणाला वेगळे रूप देतो.

Lake Hillier | pinterest

सोकोत्रा ​​बेट

येमेन येथे सोकोत्रा ​​बेट आहे. छत्रीसारख्या आकाराची ड्रॅगन्स ब्लड ट्रीज आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती यामुळे हे बेट जगातील सर्वांत वेगळ्या नैसर्गिक ठिकाणांपैकी एक आहे.

Socotra Island | pinterest

वेटोमो ग्लोवॉर्म केव्हज

न्यूझीलंड येथे वेटोमो ग्लोवॉर्म केव्हज हे ठिकाण आहे. गुहेच्या छतावर चमकणाऱ्या काजव्यांसारख्या जीवांमुळे अंधारात निळ्या प्रकाशाचे अप्रतिम दृश्य दिसते.

Waitomo Glowworm Caves | pinterest

अँटिलोप कॅन्यन

अमेरिका येथे अँटिलोप कॅन्यन हे ठिकाण आहे. येथे दगडांमधील रंगांची जादू पाहता येते. वाऱ्याने आणि पाण्याने आकार दिलेल्या वळणदार वाळूच्या दगडांवर सूर्यकिरणे पडल्यावर नारिंगी व सोनेरी छटा खुलतात.

Antelope Canyon | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : ना रस्ते, ना ट्रॅफिक, ना गाड्या! परीकथेतल्या गावासारखं सुंदर ठिकाण, जिथे लोक बोटीतून करतात प्रवास

Unique Village | AI PHOTO
येथे क्लिक करा...