Agriculture Minister Datta Bharane Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: आमचं लग्न होईना, पाऊस पडेना...; शेतीच्या बांधावरून तरुण शेतकऱ्याचा कृषीमंत्र्यांना फोन

Agriculture Minister Datta Bharane: कृषीमंत्री दत्ता भरणे यांना बीडमधील एका तरुण शेतकऱ्याने फोन करून त्याची व्यथा मांडली. लग्न जुळत नसल्याचे त्याने सांगितले.

Priya More
  • बीडच्या आष्टी तालुक्यातील शेतकरी अशोक मानेने केला कृषीमंत्र्यांना फोन

  • दत्ता भरणे यांना फोन करून कर्जमाफी आणि पावसाबाबत व्यथा मांडली

  • शेतकऱ्याने कर्जमाफीतील अटी शिथिल करण्याची मागणी केली

  • दत्ता भरणे यांनी ४० हजार कोटींच्या कर्जमाफीचा दावा केला

योगेश काशिद, बीड

डोक्यावर वाढते कर्ज कर्ज, लग्न होईना, अन् राज्यात पावसाच्या दडीमुळे शेतीचं नुकसान यामुळे राज्यातील तरुण शेतकरी सध्या चिंतेत आहे. बीडमधील अशाच एका शेतकऱ्याने थेट शेतीच्या बांधावरून राज्याचे कृषीमंत्री दत्ता मामा भरणे यांना फोन केला. आमचे लग्न होईनात, पाऊस नाही, आमची कर्ज माफी सरसरकट करण्याची मागणी या तरुण शेतकऱ्याने कृषीमंत्र्याकडे केली. आयटी रिटर्न भरलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी द्या असे मत या शेतऱ्याने मांडले. अशोक माने असं या शेतकऱ्याचे नाव असून तो आष्टीचा आहे.

सध्या राज्यामध्ये पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत मात्र आता उगवलेलं वाळून जाते की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळे बीडच्या आष्टी तालुक्यातील अशोक माने या शेतकऱ्याने चक्क राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांना थेट फोनवरून संपर्क साधला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी केलेली नाही त्यामध्ये काही अटी आहेत त्या कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली.

तर दत्तामामा भरणे यांनी सांगितले की, चाळीस हजार कोटीची ही कर्जमाफी केलेली आहे. तर ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी आयटी रिटर्न भरले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीत घ्यावे, सध्या पावसाचं जे संकट आहे ते मानवनिर्मित नाही निसर्गनिर्मित संकट आहे त्याला कुणी काहीही करू शकत नाही.'

तरुण शेतकरी आणि दत्ता भरणे यांच्यात नेमकं काय बोलणं झालं?

शेतकरी - नमस्कार

मंत्री दत्ता मामा भरणे - नमस्ते

शेतकरी - भाचा तुम्हाला फोन करतोय दोन दिवसांपासून तुमचं अधिवेशन चालू असल्यामुळे फोन लागत नाही.

मंत्री - बर बर बोला.

शेतकरी - निसर्गराजांनी कोप केला आहे. शेतामध्ये बसलो आहे. तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. अक्षरशा शेताला देण्यासाठी पाणी नाही मामा.

मंत्री - बरं बरं

शेतकरी - मामा आम्हाला वाटलं होतं तुम्ही भाच्यांच्या डोक्यावरचे कर्ज पूर्ण फेडताल आणि सातबारा कोरा करताल. तुम्ही सातबारा कोरा गोरा करता म्हटले पण तसं काही झालं नाही. आज आमच्यावरती खूप वाईट वेळ आली आहे. माझ्या शेजारील शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होत नाही.

मंत्री - खरं खरंय, मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत एवढी मोठी ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. अशा अडचणीच्या काळामध्ये कुठली निवडणूक समोरी नसताना देखील कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. खरंच पाहून तुम्हाला मी सांगतो आभार मानले पाहिजेत. मी पण शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजू शकतो. या घोषणामुळे सर्वांच समाधान होणार नाही मात्र 56 लाख शेतकरी यामध्ये लाभ घेतील.

शेतकरी- राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि तुमचे स्वागत करतो आम्ही इथे असं काही म्हणत नाहीत मामा ज्या अटी केलेले आहेत त्या थोड्या शिथिल करा.

मंत्री: पाऊस नाही हे निसर्गाचे संकट आहे. ते मानवनिर्मित संकट नाही पण आपल्याला सर्वांना मार्ग काढावा लागेल आणि विश्वास ठेवावा लागेल.

मंत्री - अपेक्षा ठेवून सामोरे जावे लागेल कारण आपण अपेक्षा वरच जगतो.

शेतकरी - मामा तुम्ही मायबाप सरकार आहात कर्जमाफीतील अटी शिथिल करा शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा रहा.

मंत्री: कुठली आठ कुठली आठ ते तर कळू द्या.

शेतकरी: सरकार म्हटले होते सातबारा कोरा करू.

मंत्री - ते होणार नाही ते होणार नाही. खरंच सरकारची आर्थिक परिस्थिती खूप अडचणीची आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. शेवटी जे मिळते ते त्याचे स्वागत केले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गेल्या आठ दिवसांपासून पाऊसाची दडी पिके धोक्यात, पिके वाचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर मोठी घोषणा

लादी पुसल्यानंतरही चिकट वाटते? पाण्यात 'हा' एक पदार्थ मिसळून पाहा

Pyarelal wife Death: ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर; पत्नी सुनीला शर्मा यांचे निधन, संगीतविश्वात हळहळ

Hair Growth Tips: केस गळणं होईल कायमचं बंद! डोक्यावर नवीन केस आणेल 'हा' १ चमत्कारी काळा पदार्थ

SCROLL FOR NEXT