Dharur News Saam tv
महाराष्ट्र

Dharur News : पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात टाकली गाडी; गाडीसह व्यापारी गेला वाहून, रिक्षा चालकही वाहिला

Beed News : धारूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नदी नाला ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: परळी तालुक्यातील शिरसाळा येथील घटना ताजी असतानाच रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील अडत व्यापारी गाडीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात गाडी टाकली. यात गाडीसह व्यापारी वाहून गेला आहे. 

बीड जिल्ह्यातील अंजनहोड येथील अडत व्यापारी तथा माजी सरपंच नितीन शिवाजीराव कांबळे (वय ४२) असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारूरसह अनेक भागांमध्ये काल सायंकाळपासून पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज होती, त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. 

पाण्याचा अंदाज न आल्याने गेले वाहून 

दरम्यान नितीन कांबळे हे रुई धारूरकडुन अंजनडोहकडे चारचाकी वाहनातून जात होते. वाण नदीच्या पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नितीन कांबळे हे गाडीसह वाहून गेले होते. तसेच धारूर - आवरगाव रस्त्यावरील आवरगाव येथील पूलावर धारूर तालुक्यातील गोपाळपूर अंतर्गत संभाजीनगर येथील ऑटो चालक लोखंडे ऑटोसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. 

१० तासानंतर मृतदेह सापडला

रुई धारूर, अंजनडोहसह जवळच्या गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली होती. तसेच धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे तहसील प्रशासनातील नाय तहसीलदार सुरेश पाळवदे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवर मंडळ अधिकारी कपिल गोडसेसह महसूल -पोलीस अधिकारी कर्मचारी, उपसरपंच प्रकाश सोळंके तसेच परिसरातील नागरिक घटनास्थळी जाऊन शोध कार्यसाठी प्रयत्न केले. तरी कांबळे व लोखंडे यांचा शोध लागला नव्हता. मात्र नितीन कांबळे यांचा मृतदेह आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान सापडला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानींचा आत्महत्येचा प्रयत्न

Maharashtra Government: राज्यातील शिक्षकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, टप्पा अनुदानाला मंजुरी

Mithila Palkar: मिथिला पालकरच्या सौंदर्याची जादू, साडीतील फोटोंनी केले घायाळ

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; केबिनमध्ये पुरूष अन् महिला आक्षेपार्ह स्थितीत, मालक पती-पत्नी फरार

Shaktipeeth Highway Project : शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी बातमी! जीआर काढला, भूसंपादन आदेशातून कोल्हापूरला वगळलं

SCROLL FOR NEXT