Saurabh Sonawane on Vilas Ghule Case  saam tv
महाराष्ट्र

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Saurav Sonawane questioned by SIT: विलास घुले हत्याकांड प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर....

Priya More
  • विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर

  • एसआयटीकडून तपास वेगाने सुरू

  • सौरव सोनवणे यांची ४ तास सखोल चौकशी

  • सीसीटव्ही आणि सीडीआरमध्ये संशयास्पद बाब आढळली नाही

योगेश काशिद, बीड

बीडच्या विलास घुले हत्याकांड प्रकरणाच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विलास घुलेची हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांनी चाकूने वार करत हत्या केली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव समोर आलं होतं. पोलिसांनी त्याची चौकशी केली. पण या प्रकरणात बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांच्यासंदर्भात कुठलाही ठोस पुरावा आढळून आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

SIT कडून ४ तास झाली होती सौरव सोनवणे यांची चौकशी -

सौरव सोनवणे यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते आणि फिर्यादीकडून पुरवणी जबाब नोंदवण्यात आला होता. या अनुषंगाने काल एसआयटीने पुरवणी जबाबाप्रमाणे सौरव सोनवणे यांची चार ते पाच तास चौकशी केली. यानंतर सौरव सोनवणे यांचा देखील जबाब एसआयटीकडे नोंदवण्यात आला आहे. मात्र सौरव सोनवणे यांच्यासंदर्भात कुठलाही ठोस पुरावा आढळून येत नसल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

चौकशीदरम्यान विचारण्यात आलेले प्रश्न -

प्रश्न: SIT- ज्या दिवशी विलास घुले यांची हत्या झाली त्या दिवशी तुम्ही कुठे होते?

उत्तर: सौरव सोनवणे - मी त्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये कारखान्यावर आणि नंतर पवनसुत येथील निवासस्थानी होतो.

प्रश्न: SIT- ज्या थार गाडीचा उल्लेख पुरवणी जबाबमध्ये करण्यात आलेला आहे. ती गाडी त्या दिवशी नेमकी कुठे होती?

उत्तर: सौरव सोनवणे- त्या दिवशी माझी थार गाडी पवनसुत येथील निवासस्थानी होती आणि ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील दिसत आहे.

प्रश्न: SIT - ज्या आरोपींनी विलास घुले यांची हत्या केली आहे तुमची त्यांच्या कधी फोन झाले आहेत का?

उत्तर: सौरव सोनवणे - सहा महिन्यांपासून आणि याच्या अगोदर आमची त्यांचे कुठलेही फोन कॉल किंवा काहीही नाही आणि संबंधही नाही.

एसआयटीकडून खासदार बजरंग सोनवणे यांच्या पवनसुत येथील निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजमध्ये सौरव सोनवणे हे पवनसुत येथील निवासस्थानी आढळून आले आहेत. एसआयटीकडून सीडीआर तपासण्यात आले असून कुठलाही फोन कॉल किंवा संभाषण झाल्याचे आढळून आले नाही. सौरव सोनवणे यांची एसआयटीकडून ४ तास चौकशी झाली. या चौकशीमध्ये कुठलीही बाब संशयास्पद आढळून आले नसल्याचे सूत्रांकडून विश्वास नाही माहिती मिळाली आहे. यामुळे सौरभ सोनवणे यांच्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनाळ्यात चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू...

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Fat Loss: सुटलेलं पोट होईल झटपट कमी; सकाळी कोमट पाण्यात टाकून प्या हा घरातला फायदेशीर पदार्थ

SCROLL FOR NEXT