Beed Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडमध्ये मारहाणीत विकासचा मृत्यू, हत्येनंतर क्षीरसागरचा फोन; ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

Beed Police: बीडमध्ये विकास बनसोडे या तरुणाची मालकानेच हत्या केल्याची घटना घडली. विकासच्या हत्येनंतर आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून ताबडतोब माझ्या घरी या असे सांगतो. याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ही घटना घडली. विकास बनसोडे असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आहे. विकासला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. विकासची हत्या झाल्यानंतर आरोपी भाऊसाहेब क्षीरसागरने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून त्यांना ताबडतोब आमच्या घरी या असे सांगतो. त्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

विकास बनसोडे हा २५ वर्षांचा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता. भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास ट्रक चालक म्हणून काम करत होता. विकासचे बनसोडे क्षीरसागरच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती क्षीरसागरला मिळताच त्याने विकासला दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.

भाऊसाहेब क्षीरसागरने विकासच्या कुटुंबीयांना फोन करून ताबडतोब तुम्ही आमच्या घरी निघून या असे सांगितले. त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ क्लीप व्हायरल झाला आहे. यामध्ये क्षीरसागर विकासच्या कुटुंबीयांना सांगतो की, 'तुम्ही नवरा-बायको लवकरात लवकर या. तुमच्या जे कुणी असेल त्याला घेऊन या. इकडे आल्यावर तुम्हाला पराक्रम सांगतो. अर्जंटमध्ये या. जास्त टाईमपास करू नका. तुमचा लेक माझ्याकडे आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या.'

क्षीरसागरच्या बोलण्यावर विकासची आई म्हणते की,'आता आम्हाला ऐवढं अर्जंट वाहन कसे मिळेल आम्ही कसं येणार.' त्यावर संध्याकाळपर्यंत तुम्ही कसंही या आमच्याकडे असे क्षीरसागर त्यांना म्हणतो. 'तुम्ही इथे या आल्यानंतर तुम्हाला सर्व हिस्ट्री सांगतो. तुम्ही संध्याकाळपर्यंत इथे आले पाहिजे आणि येता येत नसेल तर तसं सांगा. तुम्ही आताच्या आता गाडीत बसले पाहिजे.', अशी दमदाटी देखील तो विकासच्या कुटुंबीयांना करताना ऐकू येत आहे.

विकासची आई क्षीरसागरला विचारते 'तो कुठे आहे' तर यावर तो आहे असं म्हणतो. यानंतर विकासची आई म्हणते की, 'तुम्ही आता त्याला जी काही मारहाण केली असेल. पण आता त्याला मारू नका. आम्ही येईपर्यंत त्याला हात नका लाऊ. आम्ही येतो पण तुम्ही त्याला काही करू नका मामा.', असे म्हणते. यावर क्षीरसागर त्यांना म्हणतो की, 'मामा म्हणून माझीच वाट लावली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT