Satish Bhosale Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale : बीडमध्ये गुन्हेगारीला ऊत, अज्ञातांनी खोक्याचं घर जाळलं; कुणी आणि का लावली आग?

Beed Crime : कराड टोळीनंतर आता खोक्यालाही गजाआड करण्यात आलंय. मात्र बीडमध्ये आणखी गुन्हेगारीची नवी प्रवृत्ती तयार झालीय. खोक्याचं घर जाळण्यात आलंय. मात्र खोक्याचं घर कुणी आणि का जाळलं? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Yash Shirke

भाजप आमदार सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. मात्र दुसरीकडे वनविभागाने बुलडोजर चालवलेल्या खोक्या भोसलेच्या घराला अज्ञाताने आग लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आलाय. त्यावरुन खोक्याला शिक्षा द्या, पण आमच्यावर अन्याय का?, असा उद्विग्न सवाल खोक्या भोसलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केलाय.

खोक्या भोसलेने शिरुर तालुक्यातील दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केली.. एवढंच नाही तर पैशांचा माज, वन्यजीवांच्या कत्तली, घरात आढळलेला गांजा यामुळे खोक्या अडचणीत आला. तर याच खोक्यावर वन्यप्राण्यांची शिकार आणि मांसाच्या तस्करीसह 20 गुन्हे दाखल आहेत.

खोक्यावर कोणते आरोप?

- खोक्याने दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केल्याचा आरोप

- बुलढाण्याच्या कैलास वाघला अमानुष मारहाण

- हरीण, काळवीट, मोर आणि सश्यांच्या कत्तलीचा आरोप

- शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना धमकी

- नोटा उधळून माज दाखवल्याचा आरोप

तर खोक्या हा जातीयवादाचा बळी ठरल्याचा आरोप खोक्याच्या वकिलांनी केलाय.

खोक्याच्या प्रयागराजमध्ये मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगरमार्गे शिरुरला आणलं. दरम्यान झोपलेल्या वनविभागाने तत्परता दाखवून केवळ एका नोटीशीवर खोक्याच्या घरावर कारवाई केली खरी. पण त्याच रात्री खोक्याचं घर पेटवून देण्यात आलं. त्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र घरं जाळण्याचा खोडसाळपणा कुणी केला? खोक्याच्या घरात बड्या धेंडांना अडचणीत आणणारे काही पुरावे होते का? याच कारणातून त्याचं घर जाळण्यात आलंय का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT