परळीतील एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला
दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली
डमी ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई केली
लॉज मॅनेजर आणि एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
बीडच्या परळीमध्ये पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी छापा टाकत दोन महिलांना आणि पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं. पोलिसांना परळी येथील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहकाला पाठवले होते. त्यानंतर पोलिसांनी या लॉजवर छापा टाकला. याठिकाणावरून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षआणि परळी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या दोन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. परळी ग्रामीण हद्दीत असणाऱ्या लॉजवर बाहेरील जिल्ह्यातून महिलांना बोलावून त्यांच्यामार्फत वेश्या व्यवसाय केला जात होता. पोलिसांनी या गुप्त माहितीच्या आधारे या लॉजवर छापा टाकला. डमी ग्राहकाला या लॉजवर पाठवण्यात आले. या ठिकाणी असणाऱ्या वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी १५०० रुपयांची मागणी केली.
डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देवून पोलिस पथकास सांगितले. या डमी ग्राहकाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. या ठिकाणी दोन पीडित महिला आढळून आल्या. एका महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता तिने ती भिवंडीची असल्याचे सांगितले. एका व्यक्तीच्या फोनवरून ती याठिकाणी आली होती. तर दुसरी महिला पुण्यावरून आली होती. प्रत्येक ग्राहकांकडून १५०० रुपये घेतले जातात आणि त्यातील ५०० रुपये आम्हाला मिळतात असे या महिलांनी सांगितले.
लॉजचा मॅनेजर, एजंट या महिलांना बोलावून घेतात आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेवून पीडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी दोघांविरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३,४,५,६ ,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईमुळे परळीत खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.