Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : अंबाजोगाईत चोरट्यांचा हैदोस; एका रात्रीत चार दुकाने फोडली, किराणा दुकानातून लांबवीले तेलाचे डबे

Beed Ambajogai News : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटयांनी नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवरील दुकाने टार्गेट केले आहेत. एकाच रात्री टप्प्याटप्प्याने हि चोरी केली असून एकूण किती ऐवज लांबविली याची माहिती समोर आलेली नाही

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: अंबाजोगाई शहरात रात्रीच्या सुमारास चोरट्यानी धुमाकूळ घातल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्ताला आव्हान दिले असून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चार दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही सर्व ठिकाणे वर्दळीच्या भागात असूनही चोरट्यांनी निर्भीडपणे हात साफ केल्याने पोलीस बंदोबस्तावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बीडच्या अंबाजोगाई नगर परिषदेसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावरील पॅराडाईज वाईन शॉप, प्रशांत नगरमधील डॉ. तट यांचा दाताचा दवाखाना व बनाळे यांचे किराणा दुकान तसेच कलावती हॉस्पिटलखालील मेडिकल स्टोअर अशी चार ठिकाणे या चोरट्यांनी लक्ष्य केली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत ऐवज लांबविला आहे. या चोऱ्यांमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सीसीटीव्हीत चोरटे कैद 

दरम्यान पॅराडाईज वाईन शॉपमध्ये गाडीतून आलेल्या तीन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे प्राथमिक सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. तर किराणा दुकानातून १५ तेलाचे डबे घेऊन चोरटे पसार झाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरीही चोरी झाली होती. त्या प्रकरणातील चोर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यातच आता पुन्हा चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह 
गस्तीसाठी पोलिसांची गाडी रात्री फिरते, परंतु इतक्या वर्दळीच्या भागात सलग चार ठिकाणी चोरी होत असताना गस्ती पथक काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. या घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांनी तातडीने ठोस कारवाई करून चोरांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT