Policeman Threatens Farmer saam
महाराष्ट्र

'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या'; पोलिसांकडून शेतकऱ्यांना धमकी, बीडमध्ये चाललंय काय?

Policeman Threatens Farmer: पवनचक्की कंपनीकडून मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांची धमकी. व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • बीडमधील धक्कादायक प्रकरण.

  • पोलिसांकडून शेतकऱ्याला धमकी.

  • व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांकडून संताप व्यक्त.

बीडमध्ये गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पवनचक्की कंपनीकडून मावेजा (भरपाई) मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या', अशा शब्दांत पोलिसांनी शेतकऱ्याला धमकी दिली असल्याचं व्हिडिओतून समोर आलंय. या घटनेनंतर बीडमधील वातावरण पुन्हा एकदा चिघळलं असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओ२ Renewable या पवनचक्की कंपनीचा वीजपुरवठा करणारा टॉवर आणि विद्युत तारा शेतकरी गणेश झोडगे आणि कृष्ण कुडके यांच्या शेतातून जात असल्याची माहिती आहे. कंपनीकडून योग्य मावेजा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी यासंदर्भात निर्णय घेतला होता.

काम थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. नेकनूर पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी, दत्ता बळवंत, सचिन मुरूमकर आणि सचिन गर्जे तिन्ही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दत्ता बळवंत संतप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांना धमकी दिली. 'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या', अशी शब्दांत त्यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी या घटनेचा विरोध दर्शवला. दरम्यान, या घटनेबाबत पोलीस दत्ता बळवंत यांच्यासोबत संपर्क साधण्यात आला. त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, 'तो व्हिडिओ आमचाच आहे. शेतकरी टॉवरचे नट - बोल्ट काढत होते. आम्ही त्यांना कायदेशीर मार्गानं मावेजा मिळवण्यास सांगत होतो. पण शेतकरी ऐकत नव्हते', असं पोलीस म्हणाले.

हे प्रकरण समोर येताच तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. पोलिसांच्या वागणुकीबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wall Stain: डाग अच्छे है! मुलांनी भिंतीवर चित्र काढून भिंती खराब केल्या? 'या' सिंपल ट्रिक्सनं होतील साफ

Manache Shlok Movie Controversy: पुण्यातच मराठी चित्रपटाचा शो बंद पाडला; काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो केवायसी करा, नाहीतर... अजित पवारांची वॉर्निंग; Video

Maharashtra Live News Update: घायवळच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहाराची ४० प्रकरणं समोर

Maharashtra Politics : ठाकरेंच्या युतीत पवारांची एन्ट्री, पण महाविकास आघाडीचं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT