कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

Satara Soldier Dies of Heart Attack: पंजाबच्या चंदीगडमध्ये कर्तव्य बजावत असताना जवानाचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवाची आज त्यांच्या गावी अंत्ययात्रा काढण्यात येईल.
Satara Soldier Dies of Heart Attack
Satara Soldier Dies of Heart AttackSaam
Published On
Summary
  • साताऱ्यातील जवानाचा चंदीगडमध्ये मृत्यू.

  • ह्रदयविकाराच्या झटक्यानं सोडले प्राण.

  • सुर्वे कुटुंबावर दुखा:चा डोंगर.

साताऱ्यातील जवानाचा पंजाबमधील चंदीगडमध्ये कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. शहीद जवान यांचे पार्थिव विमानाने आज पहाटे पुण्यात दाखल होईल. रूग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह कराडला आणण्यात येईल. नंतर त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येईल. शेवटी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

सोमनाथ शामराव सुर्वे (वय वर्ष ४७) असे शहीद जवानाचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील कराड येथील आबईचीवाडीतील रहिवासी होते. सुर्वे पंजाबमधील चंदीगडमध्ये कर्तव्यावर होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सुर्वे यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Satara Soldier Dies of Heart Attack
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी नाशिकमध्ये मोठी घडामोड, भाजप नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, शामराव सुर्वे हे २४ व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांची १८वर्षे सेवा पूर्ण झाली होती. पुढील ६ महिन्यांत सुर्वे आपल्या कार्यातून निवृत्त होणार होते. सध्या ते पंजाबमधील चंदीगडमध्ये कर्तव्य बजावत होते. सैन्य दलाच्या पुरवठा विभागात ते हवालदार पदावर कार्यरत होते. परंतु निवृत्त होण्यापूर्वीच नियतीनं डाव साधला. सुर्वेंचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Satara Soldier Dies of Heart Attack
'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर अन् माझी हो..' प्राध्यपकानं तरूणीला घरी नेलं, 'नको तिथे स्पर्श' करत लैंगिक अत्याचार

सुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला याची माहिती देण्यात आली. सुर्वेंच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. तीन महिन्यांपूर्वीच ते रजेवर असताना कराड तालुक्यातील आपल्या गावी आले होते. त्यांनी अनेक तरूणांना मार्गदर्शन देखील केलं.

शहीद जवान सुर्वे यांचं पार्थिव विमानाने पहाटे पुण्यात दाखल झाले. रूग्णवाहिकेतून त्यांचं पार्थिव कराडला दाखल होईल. आबईचीवाडीत त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात येईल. नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. सुर्वे यांच्या पश्चात पत्नीस मुलगा, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com