Beed News Saam TV
महाराष्ट्र

Beed News : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

Beed Crime News : बीडच्या केज तालुक्यात विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून दिनांक 5 एप्रिल रोजी विष प्राशन केले होते. उपचार सुरू असताना 12 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला.

Ruchika Jadhav

विनोद जिरे

बीडच्या केज तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीडच्या केज तालुक्यातील औरंगपूर येथे ही धक्कादायक घटना घडलीये. ८ वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून दिनांक 5 एप्रिल रोजी विष प्राशन केले होते. विष प्राशन केल्याते समजताच तिला तातडीने अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे उपचार सुरू असताना 12 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून कुंबेफळ येथील दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गंभीर बाब म्हणजे हा छेडछाडीचा प्रकार पीडितेने कुटुंबीयांना सांगितला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांची समजून घातली होती. परंतु त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिला. त्यामुळे पीडितेने या सर्वातून मुक्त होण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. सदर घटनेमुळे संपूर्ण गावातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT