Crime News: जमिनीच्या मोबदल्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आणलं बनावट सही शिक्क्याचं पत्र; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime News: जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्वाक्षरी, शिक्क्याचे बनावट पत्र बनवल्याचं समोर आलं आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam Tv

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्वाक्षरी, शिक्क्याचे बनावट पत्र बनवल्याचं समोर आलं आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Nashik Crime News) आलाय. जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्वाक्षरी आणि शिक्क्याचे बनावट पत्र बनवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी नाशिकच्या पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Crime News) याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्वाक्षरी, शिक्क्याचे बनावट पत्र सादर केल्याप्रकरणी नाशिकच्या पांजरपोळ पदाधिकाऱ्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Signature Stamp From CM Office) आलाय. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे.

भूसंपादन प्रकरणाच्या सुधारित निवाड्याची सद्यःस्थिती आणि मोबदला मिळवण्यासाठी केलेल्या अर्जासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील स्वाक्षरी, (Fake Letter To Get Land Compensation) शिक्क्याचे बनावट पत्र सादर करून शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न आणि दिशाभूल करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पांजरपोळ संस्थेचे व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा हा गुन्हा दाखल (Land Compensation) करण्यात आलाय.

Nashik Crime News
Nashik Crime: पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये गेला.. दुसऱ्या दिवशी तळघरात मृतदेह आढळला; नाशिकमध्ये खळबळ

विभागीय आयुक्तालयातील तहसीलदार मीनाक्षी राठोड यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. १२ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात हा प्रकार घडला. सादर करण्यात आलेलं पत्र बनावट असल्याचा संशय (Nashik Crime News) आल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने त्याबाबत मुख्यमंत्री सचिवालयातून माहिती घेतली असता, तसे पत्र निर्गमित झालेलं नसल्याचं कळवण्यात आलं होतं. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime News
Nagpur Crime: संशयाचं भूत मानगुटीवर, पत्नीसह मुलाची हत्या करत पतीने संपवलं जीवन; नागपुरातील भयानक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com