Mob Brutally Brutally Beaten To Family In Beed saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडमध्ये गुंडाराज; जमिनीच्या वादावरून कुटुंबाला बेदम मारहाण, कुमशी गावातील धक्कादायक प्रकार

Mob Brutally Brutally Beaten To Family In Beed: जमिनीच्या वादावरून कुमशी गावातील भिसे कुटुंबीयांवर ४० ते ५० जणाच्या टोळीने मारहाण केलीय.

Bharat Jadhav

योगेश काशिद , साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याचं नाव गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे तेथील कायदा सुव्यवस्था कोलमडली असल्याचं दिसत आहे. आज पुन्हा एका कुटुंबाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मारहाणीचा घटना जमिनीच्या वादातून झालीय. कुमशी गावात राहणाऱ्या भिसे कुटुंबाला बेदम मारहाण झालीय.

भिसे कुटुंबीय यांच्या जमिनीचा वाद कोर्टात आहे. याच जमिनीच्या वादावरून त्यांना मारहाण झालीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामुळे खळबळ उडालीय. कुमशी गावातील भिसे कुटुंबावर भाडोत्री गुंडांनी मारहाण केलीय. या मारहाणीत जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणात मारहाण झालेल्या अनिल भिसे या तरुणाने घडलेली आपबीती सांगितली. जमिनीच्या वादातून ही मारहाण झालीय. भाड्याने ४०-५० गुंड आणून लहान मुलं, महिला, पुरुषांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. यामध्ये भिसे कुटुंबातील तिघेजण जखमी झालेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुंडांनी मारहाणीसाठी काठ्या, कुऱ्हाडीचा आणि धारदार शास्त्राचा वापर केला.

भिसे कुटुंबाला गुणा नावाच्या टोळीकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान या टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पण या टोळीवर कारवाई होईल का? असा प्रश्नही केला जातोय. या टोळीकडून दोन महिलांना देखील मारहाण करण्यात आलीय. याप्रकरणी भिसे कुटु्ंबीयांनी माहिती देताना सांगितलं की, ४० ते ५० गुंडांनी बोलून आम्हाला मारहाण केली. कोर्टामध्ये जमिनीचा वाद सुरू आहे. मात्र आम्हाला कायमचे संपवून टाकू पेटवून देऊ,अशा धमक्या दिल्या जात असल्याचं पीडित भिसे कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT