
पराग ढोबळे, साम प्रतिनिधी
किरकोळ वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना नागपूरमधील कळमना येथे घडलीय. रात्री घरी उशिरा का आलास असं विचारत मोठा भाऊ धाकट्या भावावर संतापला. उशिरा आल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरत धाकट्या भावाने मागचा पुढचा विचार न करत मोठ्या भावावर विळ्याने वार केले. ही घटना आईच्या डोळ्यासमोरच घडली.
राजू कुंभलाल यादव (वय ३०) असं मृत मोठ्या भावाचे नाव आहे, तर विजय यादव (वय २३) असं आरोपीचं नाव आहे. राजू मजुरीचे काम करायचा तर विजय कळमना बाजारात काम करतो. याप्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून मुलगा विजय यादव याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, गुलनशनगर येथील रहिवाशी रमा यादव (वय ६०) यांना तीन मुले आहे एक मुलगी आहे. राजू हा मजुरी करायचा तर विजय आहे. कळमना येथील बाजारात मिरची व्यापाऱ्याकडे काम करतो. विजयला कामावरून आल्यानंतर टोळक्यासोबत हिंडण्याची सवय होती.वस्तीत फिरून टवाळक्या करतो. घटनेच्या म्हणजेच मंगळवारी रात्री सर्वजण घरी होते. आई जेवण करून शेजारी राहणाऱ्या नातीसोबत गप्पा करत होत्या. जर राजू हा जेवण करून बसला होता.
त्यावेळी धाकटा भाऊ विजय घरी आला. घरी उशिरा का आला? इतका वेळ कुठे होता? याचे कारण विचारले आणि विजयवर रागावला. थोडा वेळ रागावल्यानंतर त्याने 'जेवण करून घे, असं म्हणत विजयला जेवण करायला सांगितले. त्यानंतर विजयने मोठ्या भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर दोन भावात वाद पेटला. वाद विकोपाला जाताच विजयने स्वयंपाकघरात जाऊन तेथून विळा आणला.
रागाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता राजूवर सपासप वार केले. विजयने राजूच्या डोक्यावर आणि छाती, पोटावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात राजू गंभीर जखमी झाला. लहान भावाने मोठ्या भावावर जीवघेणा हल्ला करत असताना आईने आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारी राहणारे जावई धावत त्यांच्या घरी आले. त्यांनी जमखी असलेल्या राजूला मेयो रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला. नोंदवण्यात आलेल्या तक्रारीवरून आरोपी विजय विरूद्ध गुन्हा दाखल केलाय. काही वेळातच आरोपी विजयला अटक केली. शवविच्छदेनानंतर पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.