Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed: ९५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा; ८१८ पैकी १७२ पाण्याचे नमुने दूषित

९५ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा; ८१८ पैकी १७२ पाण्याचे नमुने दूषित

विनोद जिरे

बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लाखोंचा निधी उचलणाऱ्या ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यातील तब्बल ९५ गावात ग्रामपंचायतीकडून (Gram Panchayat) दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. गावकरी जे पाणी पीत आहेत, ते पाणी पिण्यायोग्य नसून दूषित आहे. (Beed Contaminated water supply in 95 villages)

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून वर्षातून दोनवेळा (Beed News) गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीर, बोअर, आड, हापसा यांचे पाणी नमुने घेतले जातात. तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन, नळाचे नियमित पाणी नमुने तपासणीसाठी घेतले जातात. ते नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. तसेच ग्रामपंचायतींकडूनही नमुने घेऊन उपविभागीय प्रयोगशाळेत पाठविले जातात. जून महिन्यात जिल्हा प्रयोगशाळेत ५५५ नमुने तपासले असता त्यात १०२ अहवाल दूषित पाणी असल्याचे समोर आले. तर उपविभागीय प्रयोगशाळेत २६३ नमुने तपासले असता त्यापैकी ७० अहवाल दूषित आढळले आहेत. ऐन पावसाळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दूषित नमुने आल्याने जलजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे तात्काळ पाण्याचे शुद्धीकरण होणे गरजेचे आहे; अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांनी दिली.

१७२ नमुने दूषित

नळाला येणारे पाणी स्वच्छ दिसत असले तरी, ते दूषित आहे का? याची तपासणी करणे उचित आहे. कारण आरोग्य विभागाने जून महिन्यात ८१८ पाणी नमुन्यांची तपासणी केली असता तब्बल १७२ नमुने दूषित आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे. आता ग्रामपंचायतींनी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा साथरोगांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

तालुकानिहाय दूषित पाणपुरवठा झालेल्‍या गावांची संख्‍या

बीड– ३६, गेवराई- ५, माजलगाव- ३, केज- १२, धारूर- ५, शिरूर- ११, अंबाजोगाई- १०, पाटोदा- १, वडवणी- २, यासह अनेक गावांमध्ये दूषित पाणी आढळून आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT