पारोळा (जळगाव) : गेल्या 40 वर्षांपासून समाजकारणातून राजकारण करीत सर्वसामान्यांशी नाळ जुळवत विकासाला केंद्रबिंदू मानत वाटचाल केली. मतदार संघाचा विकास व्हावा; त्याचबरोबर लोकाभिमुख (Jalgaon News) कामे व्हावीत. हाच स्थायीभाव ठेवत जीवनाची वाटचाल करीत आहे. मतदार संघातील जनता व पदाधिकारी व कार्यकर्ते हीच आपली श्रीमंती असून स्वार्थासाठी कधीही राजकारण केली नसल्याची प्रतिक्रिया (Chimanrao Patil) आमदार चिमणराव पाटील यांनी दिली. (jalgaon news parola MLA Chimanrao Patil statment never politics for selfishness)
गेल्या पंधरा दिवसांपासून मतदार संघातून आमदार चिमणराव पाटील हे शिंदे गटाबरोबर होते. विधान परिषदेची निवडणूक संपताच ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पहिल्या दिवसापासून होते. ते आज आपल्या मतदारसंघात आले असता आपल्या पारोळा (Parola) मतदार संघातील आपल्या मतदारांशी त्यांनी संवाद साधला.
तीस वर्ष ज्यांच्याशी संघर्ष त्यांच्याबरोबर बसणे न पटणारे
आमदार पाटील म्हणाले, की आपण कुठल्याही पदाच्या किंवा सत्तेच्या लालसेपोटी शिंदे गटाबरोबर गेलो नव्हतो. तर पक्षाचा अजेंडा हा हिंदुत्व या मुद्द्यावर आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला उठाव व त्याबरोबर जाणे मी योग्य समजतो. यावेळी त्यांनी खंत व्यक्त करताना सांगितले, की गेल्या 30 वर्षापासून ज्यांच्याशी संघर्ष केला. त्यांच्याबरोबर बसून राजकारण हे मनाला पटत नव्हते. या विषयाला अनुसरून शिंदे गटात 40 आमदार सहभागी झाले ते एकच विचाराणे हिंदुत्व आणि समान वागणूकीने.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.