Beed Politics Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Beed Politics News: मोठी बातमी! शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक; व्हायरल क्लिपनंतर कारवाई

Beed Politics Breaking News: लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे यांनी बजरंग सोनवणे यांचे काम केले होते. याबाबत खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विनोद जिरे

बीड, ता. २९ जून २०२४

बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी कथित ऑडियो क्लीप समोर आल्यानंतर बीड -अहमदनगर महामार्गावरील जामखेड येथून त्यांना अटक करण्यात आली असून बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धोका देत खांडे यांनी बजरंग सोनवणे यांचे काम केले होते. याबाबत खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये खांडे यांनी या गोष्टीची कबुली देताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वक्तव्य केले होते.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीड पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. तसेच खांडे याच्यावर काही महिन्यापूर्वी बीड ग्रामीण पोलिसात 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. आता याच गुन्ह्यात खांडे यांना अटक झाली आहे.

दरम्यान, या क्लिपवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्या विरुद्ध परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबी आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांची पथक रवाना झाली होती. अखेर खाडे यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elephant Tramples Tourist: बापरे! पर्यटकाच्या वागण्यावर भडकले गजराज; पाठलाग करत पायाखाली तुडवलं| Video Viral

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेचे सरकारचे विरोधात आंदोलन

मुंबईत दहीहंडी सरावात बाल गोविंदाचा मृत्यू, थर लावताना कोसळला, परिसरात शोककळा

Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्ताने कुटुंब गावी; बंद घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास

Coolie Advance Booking Collection: रजनीकांत यांच्या 'कुली'चा बोलबाला; पहिल्या दिवशी करणार इतक्या कोटींच कलेक्शन

SCROLL FOR NEXT