Pankaja Munde Ahmednagar Vidhan Sabha News Saamtv
महाराष्ट्र

Beed Politics News: 'भाजपच्या धोरणांमुळेच पंकजा मुडेंचा पराभव', पँथर सेनेचे नेते दीपक केदार यांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics Breaking News: भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळेच बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, असे मोठे विधान ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते भाई दीपक केदार केले आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विनोद जिरे

बीड, ता. १५ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले झाल्याने अनेक अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. याबाबत बोलताना ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते भाई दीपक केदार यांनी धक्कादायक विधान केले आहे.

काय म्हणाले भाई केदार?

"महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे धोरण विघटनवादी संघटनेकडून सुरू आहे. आणि तेच वातावरण आज बीड जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे, त्यामुळं आपल्या कुटुंबातील महिलांची काळजी घ्या, सुरक्षा करा," असं म्हणत ऑल इंडिया पँथर सेनेचे नेते भाई दीपक केदार यांनी मोठे विधान केलं आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच "पंकजा मुंडे यांचा पराभव हा कोणत्या जातीमुळे किंवा जातीवादामुळे झाला नाही. तर तो संविधान विरोधी भाजपची भूमिका आणि 400 सो पार च्या भूमिकेमुळे झाला आहे. त्या जरा अपक्ष उभ्या राहिल्या असत्या तर त्या निवडून आल्या असत्या," असे देखील दीपक केदार यांनी म्हटल आहे

विधानसभा लढवण्याचीही घोषणा!

"महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय हा ऑल इंडिया पँथर सेनेमुळे झाला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेने भाजपविरोधी भूमिका घेतली, संविधान बचावचा नारा दिला आणि त्यामुळे हा विजय झाला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत आम्ही बीड जिल्ह्यातील केज विधानसभा, त्याचबरोबर इतर ठिकाणच्या ज्या आरक्षित विधानसभा आहेत. त्या संदर्भात महाविकास आघाडी सोबत चर्चा करणार आहोत. आम्ही देखील विधानसभा लढणार आहोत," असेही ये यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT