Beed News  Saam tv
महाराष्ट्र

Beed : नवलच! बीडमधील गावकऱ्यांनी अख्खं गावच विकायला काढले, नेमकं प्रकरण काय?

Beed News : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वनवेवाडी या गावाची हि गोष्ट आहे. वनवेवाडी या गावच्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून या गावाने डांबरी रस्ताच पाहिला नाही

Rajesh Sonwane

फैय्याज शेख 

बीड : अनेक वर्षांपासून गावात सुविधा नाहीत. मुख्य म्हणजे देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून गावाला पक्का डांबरी रस्त्या झालेला नाही. तर बस सेवेची देखील समस्या आहे. या सर्व परिस्थितीला तोंड देत वनवेवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून या ग्रामस्थांनी आख्ख गावच विक्रीला काढले आहे. इतकेच नाही तर गावात जाणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन देखील केले आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वनवेवाडी या गावाची हि गोष्ट आहे. वनवेवाडी या गावच्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या गावाने डांबरी रस्ताच पाहिला नाही. डांबरी रस्ता नसल्याने वनवेवाडी गावातील नागरीकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. तर येथील विद्यार्थींना देखील रस्त्यांनी पायी चालणे मुश्किल होत आहे, अद्याप पाउस सुरू नसतांना रस्त्यांची अशी अवस्था असून पावसाळ्यात हि परिस्थिती अधिक बिकट होत असते. 

बससेवाही दुरापास्त 
गावातील वयोवृद्ध नागरिकांना किंवा अत्यावश्यक सेवेकरिता दवाखान्यात नेण्यासाठी कोणती ही रुग्णवाहिका देखील गावात येत नाही. तसेच गावात अद्याप पर्यंत बससेवा देखील सुरु झालेली नाही. एसटी केवळ मतदान पेट्यासाठीच गावात येते. तर या गावात कोणत्याच मोबाईलची रेंज नाही, या गावाशी कोणाचा संपर्क होत नाही. झाडावर चढून जिव धोक्यात घालून मोबाईल रेंजचा शोध घ्यावा लागत आहे.

ग्रामस्थांनी घातले खड्ड्यांचे श्राद्ध 
या सर्व समस्यांना त्रस्त ग्रामस्थांनी गावात आज आंदोलन केले आहे. गावच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे श्राध्द घालून कितेक वर्षापासून असलेल्या या खड्ड्यांवर पुष्पवृष्टी करत बोंबल्या आंदोलन ग्रामस्थांनी केले आहे. तर यावेळी फडणवीस सरकारने आमच गाव विकत घ्यावे नाहीतर रस्ता द्यावा आशी अजब मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे आता तरी सरकार हा रस्ता बनवील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर, वाचा

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT