Pimpri Chinchwad Corporation : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीत भराव; जलसंपदा विभागाची पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस

Pimpri Chinchwad News : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपळे निलख येथून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचे काम केले आहे
Pimpri Chinchwad Corporation
Pimpri Chinchwad CorporationSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेने मुळा नदीपात्रात भराव टाकला आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडून महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. यानुसार नदीत टाकण्यात आलेल्या राडारोडा महापालिकेने तातडीने स्वखर्चाने काढून घ्यावा. अन्यथा योग्य कायदेशीर कारवाई करू; अशी नोटीस देऊन पिंपरी चिंचवड महापालिकेला चांगलंच फटकार आहे.

नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करून पिंपळे निलख येथून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणात भराव टाकण्याचे काम केले आहे. अर्थात या भरावामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. तसेच हा भराव टाकल्यामुळे नदीच्या वहन क्षमतेत अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन लोकांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रविराज काळे यांनी तक्रार केली होती.

Pimpri Chinchwad Corporation
Bribe Case : घरपट्टी नावावर करण्यासाठी उपसरपंचाने मागितली लाच; ३० हजार घेताना रंगेहाथ ताब्यात

राडारोडा काढण्याच्या सूचना 

हि सर्व परिस्थिती लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने पावसाळ्यापूर्वी स्वखर्चाने नदी पात्रात टाकण्यात आलेला नदी सुधार योजनेचा राडारोडा काढून घ्यावा; अशा सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत. मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या भराव व राडारोड्यामुळे भविष्यात नागरिकांच्या जीवास धोका उद्भवल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही पिंपरी चिंचवड महापालिकेची असेल असे या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

Pimpri Chinchwad Corporation
Kalyan Dombivali Police : कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करांविरोधात ५० गुन्हे दाखल; कल्याण पोलीसांची सहा महिन्यात कारवाई

मात्र महापालिकेला प्राप्त झालेली नोटीस ही नदीपत्रात उभारण्यात आलेल्या कॉपर बँक साठीच आहे. त्याचा पूर्ण नदीपात्राशी संबंध नाही; अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक शेखर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे आता जलसंपदा विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com