Beed Crime news Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Ambajogai: बीड पुन्हा हादरलं! गर्लफ्रेंडनं बोलायचं बंद केलं, प्रियकराने थेट घर गाठत गोळीबार केला

Beed relationship dispute: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबाजोगाईत दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली. सरपंच संतोष देशमुख घटनेनं आधीच चर्चेत आलेलं बीड या घटनेनं पुन्हा हादरून गेलं आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या, वाल्मिक कराड खंडणी प्रकरण आणि दोन सख्ख्या भावांची हत्या या भयंकर घटनांनंतर बीड पुन्हा हादरलं आहे. बीडच्या अंबाजोगाईमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. प्रेयसीनं बोलणं बंद केलं म्हणून तिच्या कथित प्रियकरानं घराच्या खिडकीतून गोळीबार केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेनं बीड पुन्हा चर्चेत आलं आहे.

बीड क्राइमचं हॉटस्पॉट झालं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येनं तर गुन्हेगारीचा कळसच गाठला. त्यात गेल्या काही दिवसांपासूनच्या घटनांमुळं दहशतीनं बीडमध्ये ठाण मांडल्याचं चित्र आहे. आता अंबाजोगाई तालुकाही या गडद छायेखाली वावरतोय. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात दहशत पसरलीय. अंबाजोगाईत दिवसाढवळ्या गोळीबाराचा प्रकार घडला असून, या प्रकरणामुळे बीड पुन्हा हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण या तरुणाचे एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून ती गणेशला टाळत होती. गणेश चव्हाणच्या त्रासाला कंटाळून तिने त्याच्यासोबत बोलणेही बंद केले होते.

प्रेयसीनं बोलणं बंद केल्यामुळे गणेशला संताप अनावर झाला. त्याने तरूणीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर रागाच्या भरात गणेश थेट अंबाजोगाईमध्ये आला. तरूणीच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा कुणीच उघडला नाही. रागाच्या भरात त्याने खिडकीतून देशी बनावटीच्या पिस्तुलने गोळीबार केला.

गोळीबार केल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कुटुंबातील इतर मंडळी दुसर्‍या खोलीत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. नंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक गणेशच्या शोधात निघाली. तपास करीत पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे. या प्रकरणानंतर बीड मात्र पुन्हा हादरले. या आणि अशा अनेक घटनांमुळं आजूबाजूच्या गावांमध्येही दहशत माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Name History: खराडी हे नाव कसं पडलं? वाचा पुण्यातील प्रसिद्ध शहाराचा जुना इतिहास

Face Shape : तुमचा चेहरा कोणत्या आकाराचा? ही ट्रिक वापरा अन् लगेच ओळखा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

अंमली पदार्थ अन् २ बायका, फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी; खडसेंच्या जावयाला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं | VIDEO

Saiyaara Box Office Collection : जगभरात 'सैयारा'ची जादू कायम, २०० कोटींच्या क्लबमध्ये केली एन्ट्री

SCROLL FOR NEXT