Ambajogai News Saam tv
महाराष्ट्र

Ambajogai News : औषध पुरवठा करणाऱ्या विशाल एंटरप्राइजेसवर बंदी; स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठातांची माहिती, सप्लाय करणाऱ्या कंपन्याही बनावट

Beed News : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे

विनोद जिरे

बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बनावट औषध पुरवठा हा विशाल एंटरप्राइजेसकडून वितरण केले जात होते. त्या विशाल एंटरप्राइजेसवर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर या कंपनीचे बिल देखील अदा करण्यात आले नाही. त्याचबरोबर या प्रकरणाची आणि कंपनीची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी देखील करण्यात येत असल्याची माहिती; रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर धपाटे यांनी दिली आहे.

बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात एक- एक धक्कादायक माहिती समोर येत असून रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर धपाटे यांनी माहिती देत पुरवठा करणाऱ्या कंपनीवर बंदी घालण्यात आली आहे. 

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या बनावट औषधी या टाल्कम पावडर, स्टार्च आणि कॅल्शियमचा वापर करत या अजिथ्रोमायसींच्या गोळ्या तयार केल्या गेल्या. या सर्व गोळ्या हरिद्वार येथील जनावरांसाठीचे औषधी तयार करणाऱ्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधून या गोळ्या महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहेत. या पुरवठा करण्यासाठीचे एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. 

पुरवठा करणाऱ्या कंपन्याही बनावट
दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला म्रिस्टल फॉम्र्युलेशन उत्तराखंड, रिफंट फार्मा केरळ, कॉम्युलेशन आंध्र प्रदेश, मेलवॉन बायोसायन्सेस केरळ आणि एसएमएन लॅब उत्तराखंड या पाच कंपन्यांच्या माध्यमातून मेडिसिन सप्लाय करण्यात येत होता. मात्र या पाचही कंपन्या देखील बनावट असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थात या पाच कंपन्या केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे देखील समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT