Ambajogai News : धक्कादायक.. त्या बनावट गोळ्याची निर्मिती जनावरांच्या औषधी निर्मिती कारखान्यात; नागपूर, ठाण्यातही पुरवठा

Beed News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Ambajogai News
Ambajogai NewsSaam tv
Published On

बीड : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा केला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरवठा केले गेलेले औषधे हे हरिद्वारच्या जनावरांच्या औषधी कारखान्यातच तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयास बनावट औषधींचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याचा अधिक तपास केला असता याप्रकरणी ठाणे आणि सुरत (गुजरात) मधील काही जणांचा समावेश असल्याचे समोर आले होते. यानंतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. याच तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Ambajogai News
Beed News : बीडमध्ये मुलांकडून भीक मागायला लावणाऱ्या ४ महिलांवर कारवाई; बालकामगार ठेवणाऱ्या २ व्यापाऱ्यांवरही गुन्हा

पुरवठा करणारे मोठे रॅकेट 

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या बनावट औषधी या टाल्कम पावडर, स्टार्च आणि कॅल्शियमचा वापर करत या अजिथ्रोमायसींच्या गोळ्या तयार केल्या गेल्या. या सर्व गोळ्या हरिद्वार येथील जनावरांसाठीचे औषधी तयार करणाऱ्या कारखान्यात तयार करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधून या गोळ्या महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहेत. या पुरवठा करण्यासाठीचे एक मोठे रॅकेट सक्रिय असल्याचेही चौकशीत समोर आले आहे. 

Ambajogai News
Agri Koli Marriage : एकाच दिवशी साखरपुड्यासह लग्नाच्या विधीसाठी बक्षीस; हॉलही मिळणार मोफत, आगरी कोळी समाजासाठी उपक्रम

नागपूर, ठाण्यातही पुरवठा 

विशेष म्हणजे केवळ अंबाजोगाईतच नव्हे तर नागपूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातही या बनावट औषधांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा पहिला गुन्हा नागपूर त्यानंतर वर्धा, भिवंडी, ठाणे, नांदेड व आता अंबाजोगाई येथे याबाबतच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून आणखी कोठे कोठे या औषधींचा पुरवठा करण्यात आला आहे. याचा तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com