Beed Accident News update 
महाराष्ट्र

Beed Accident : पोलीस होण्याचं स्वप्न हिरावलं, सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed road accident ST bus : बीडमध्ये एसटी अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सकाळी रस्त्याच्या बाजूला धावणाऱ्या पाच जणाला एसटी बसने उडवले.

विनोद जिरे

Beed Accident News update : पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. सोलापूर, बीडसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरूण पोलीस भरतीची तयारी करतो. बीडमध्ये एसटी बसच्या अपघात तीन तरूणांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी पोलीस भरतीचा सराव करत असताना भरधाव एसटी बसने चिरडले.

पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. या अपघातामुळे घोडका राजुरी गावावर शोककाळा पसरली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न त्या तरूणाचे भंगले आहे.

पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण पहाटे धावण्याचा सराव करतात. सकाळी रस्त्याच्या बाजूने तरूण धावत सराव करतात. दररोज ज्या रस्त्यावर धावतात, त्याच रस्त्यावर त्यांचा जीव गेलाय. एसटी बसने रस्त्यावर धावणाऱ्या पाच जणांना उडवले. त्यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. नशीब बलवत्तर म्हणून दोन जण वाचले. या अपघातानंतर घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.

बीडच्या घोडका राजुरी फाट्यावर ५ मुलांना एसटी बसने चिरडल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर एकच गर्दी झाली. गावातील लोकांची गर्दी जमली. संतप्त गावकऱ्यांनी एसटी अडवली. दडगफेक केली. तोडफोड केली. त्यामध्ये एसटीच्या काचा फुटल्या आहेत. गावकऱ्यांनी चालकाला ताब्यात घेतलेय. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? योग्य वेळ जाणून घ्या

ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरूवात | VIDEO

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

SCROLL FOR NEXT