Shruti Vilas Kadam
सूर्यफूल बिया प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन E, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्सने भरपूर असतात. शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळवण्यासाठी हा उत्तम स्नॅक आहे.
यातील हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. नियमित सेवनाने एकाग्रता सुधारण्यास मदत होते.
व्हिटॅमिन E त्वचेची चमक वाढवते आणि केस मजबूत करण्यास मदत करते.
फायबर आणि प्रथिने पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.
सूर्यफूल बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास सहाय्य करतात.