Beed News : बीडमध्ये चाललंय काय? महिला सरपंचाकडे मागितली एक लाख रुपयांची खंडणी

Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील धक्कादाय प्रकार समोर आला आहे. खंडणीप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून तपास करण्यात येतोय.
पैसे
पैसेSaam Tv
Published On

Beed Crime News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणामुळे बीडमधील कायदा व्यवस्था चर्चेचा विषय असताना शुक्रवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमधील महिला सरपंचाला एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. विकास कामासाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. अंबाजोगाई तालुक्यात ही घटना घडली आहे.

संतोष देशमुख खून प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावच्या महिला सरपंचाला एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. ममदापूर-पाटोदा गावातील तिघांनी महिला सरपंचाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

पैसे
Kolhapur : बहिणीची छेड काढली,भावाला राग अनावर, मित्राचा काटा काढला, दगडाने चेहरा ठेचला,पेट्रोल टाकून पेटवलं, कोल्हापूर हादरले

नेमकं काय घडलं?

अंबाजोगाईमधील ममदापूर पाटोदा गावात विकास कामे सुरू असताना, हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते. यादरम्यानच १६ ऑगस्ट २०२४ रोजी वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली. याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत..

पैसे
Santosh Deshmukh Case : आंधळे फरारच, ६ आरोपींची कोठडी आज संपणार; कराडच्या जामीनावर सुनावणी

अंबाजोगाईमधील ममदापूर पाटोदा गावात शाळा दुरुस्तीच्या कामासाठी चार लाख रूपये आले आहेत. गावातील शाळेचं काम सुरू करण्यात आलेय. पण त्याचवेळी गावातील वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी वारंवार अडथळा निर्माण केला. त्याशिवाय चार लाखांपैकी एक लाख रूपयांची सरपंच मंगल राम मामडगे यांच्याकडे मागणी केली. या प्रकरणी सरपंच मामडगे यांनी फिर्याद दिल्यानंतर माजी सरपंच, एक सदस्य व उपसरपंचाचे पती या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ममदापूर पाटोदा या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच या महिला आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com