Beed Accident News Saam TV
महाराष्ट्र

Beed Accident News: आनंदाने लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

Parali Accident News: बीडच्या परळी तालुक्यातील हेळंब घाटात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

Beed Accident News: सध्या लगीनसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. लग्नाच्या तारखा दाट असल्याने अनेकजण एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी लग्नासाठी जात आहे. अशातच रस्त्यांवरील अपघातांच्या घटना देखील वाढल्या आहेत. मंगळवारी परभणीत लग्नाला निघालेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना, आता बीडमध्ये देखील लग्नासाठी जात असलेल्या दोन व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

बीडच्या (Beed News) परळी तालुक्यातील हेळंब घाटात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नसमारंभासाठी हेळंबकडे निघालेले दोघे जण जागीच ठार झाले आहेत. ज्ञानोबा गुट्टे (वय ४५) आणि केशव गुट्टे (वय ७५, दोघेही राहणार नंदनज, तालुका परळी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.

मयत ज्ञानोबा गुट्टे व केशव गुट्टे हे दोघेजण दुचाकीवर एका लग्न समारंभासाठी हेळंबकडे निघाले होते. या दरम्यान हेळंब घाटात दुचाकीला कारने जोरदार धडक (Accident) दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दोघांचे मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले असून मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला होता.

परभणीत कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

दुचाकीने लग्नाला जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला भरधाव वेगात येत असलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. तर इतर चारजण जखमी आहेत. कारच्‍या धडकेत दुचाकीचे देखील दोन तुकडे झाले आहेत. परभणी (Parbhani) गंगाखेड दैठणा शिवारात कार आणि दुचाकीत भीषण अपघात झाल्याची घटना दुपारी साडेबाराच्‍या सुमारास घडली आहे.

दैठण्याहून पोखर्णी नृ. येथे दिपक मारोतराव कच्छवे (वय २४) लग्नाला जात होते. दैठण्याजवळ विवेक माणिक नाईक (वय २५, रा. दैठणा) हा भरधाव कारने जात होता. यावेळी समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात दिपक कच्छवे, विवेक नाईक या दोघांचा मृत्यू झाला. पवन कच्छवे आणि इतर तीन जण असे एकूण चौघे जखमी झाले आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT