Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. आपल्या हातात आयफोन असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, त्याच्या किमती जास्त असल्याने प्रत्येकाला ते खरेदी करणे शक्य होत नाही. म्हणूनच आयफोनचं कोणतंही मॉडेल लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर येतो. (Live Marathi News)
अशातच महागडा आयफोन खरेदी केल्यानंतर तो चुकून गहाळ झाला किंवा गटारात पडला तर...? असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. एका व्यक्तीचा फोन चूकून गटारात पडला. पण त्याने आयफोनसाठी जे केले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्यक्तीने कपडे काढले अन् थेट गटारातच उडी घेतली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ हा ब्राझीलमधील असल्याचं सांगितलं जातंय. न्यूयॉर्क पोस्टनुसार, एक व्यक्ती ब्राझीलमध्ये एका हिप-हॉप महोत्सवासाठी गेला होता. यादरम्यान त्यांना शौचालयात जावे लागले. अचानक त्याच्या खिशातून त्याचा iPhone 12 Max गटारात कसा पडला हेच कळत नाही. मग काय... आयफोन गटात पडल्याचं लक्षात येताच त्याचा श्वास अडकला. (Latest Marathi News)
आता करावं तरी काय असा प्रश्न त्याला पडला. त्याने यावर उपाय शोधला आणि कॉन्सर्टमध्ये आलेल्या इतर लोकांना 400 डॉलरच्या (32 हजार रुपये) बदल्यात फोन काढण्याची विनंती केली. परंतु त्याची ही ऑफर कुणीही स्वीकारली नाही. तेव्हा नाईलाजाने त्याने कपडे काढले आणि थेट गटारात उडी घेऊन आयफोन शोधण्यास सुरूवात केली.
या प्रकरणावर न्यूयॉर्क पोस्टने जेम्स प्रेसच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्या व्यक्तीने सांगितले की त्याला फक्त त्याचा मोबाईल परत हवा आहे. त्यामुळे त्याने इतर लोकांनाही पैसे देऊ केले. मात्र कोणीही न जुमानता त्याने स्वतः गटारात उडी घेतली. तथापि, गटाराच्या घाणेरड्या चिखलात खूप त्रास सहन करून आणि कठोर परिश्रम घेतल्यानंतर, त्याला $1100 (रु. 90 हजार) मध्ये खरेदी केलेला आयफोन परत मिळाला.
या व्यक्तीने सांगितले की, तेथे बरेच लोक जमले होते, त्यातील काही लोकांनी त्याचा व्हिडिओही (Viral Video) बनवला. गटारातून आयफोन काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला दुखापत झाली आणि तो आजारी पडला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्या पायाला टाके पडले आणि टिटॅनसचे इंजेक्शन घ्यावे लागले.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.