Baramati Accident Saam Tv
महाराष्ट्र

Baramati Accident: कॉलेजवरून घरी जाताना काळाचा घाला, दुचाकीसह तरुणाला डंपरने चिरडलं, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Baramati Accident CCTV Video: बारामतीच्या तांदूळवाडीमध्ये डंपरने दुचाकीला धडक दिली. डंपरच्या पुढील चाकाखाली येऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक पळून गेला.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

बारामतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले. या अपघातामध्ये एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बारामतीमधील तांदूळवाडीमध्ये हा अपघात झाला. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बारामती पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीच्या तांदूळवाडीमध्ये डंपरने दुचाकीला धडक दिली. डंपर चालकाने अचानक यु टर्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकीवरून भरधाव वेगात येणाऱ्या तरुणांचा तोल गेला आणि ते दुचाकीसह खाली पडले. यावेळी डंपरच्या पुढच्या चाकाखाली आल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल.

दुचाकीसह तरुणाला चिरडल्यानंतर या दुचाकीवर बसलेल्या दुसऱ्या तरुणाने डंपर चालकाला अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डंपर चालक खाली उतरला आणि त्याने जखमी मुलाला पाहिले आणि त्याने डंपर तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या तरुणाने पाठलाग करत डंपर चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. हे दोन्ही तरुण महाविद्यालयातून घरी निघाले होते त्याचवेळी ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमासाठी मनसेचे पदाधिकारी रवाना

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

SCROLL FOR NEXT