Satara Wai Accident CCTV Footage : साताऱ्यातील वाई येथे थरकाप उडवणारा अपघात घडलाय. बस स्थानकाबाहेर, गर्दीच्या ठिकाणी भरधाव आलेल्या कारने पाच जणांना उडवले. वेगात आलेल्या कारने रस्ता क्रॉस करणाऱ्या पाच जणांना उडवले. त्यामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेय.
वाई बस स्थानकाबाहेर झालेल्या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेय. चार ते पाच जण रस्ता क्रॉस करत होते, ते रस्त्याच्या मधे आले, त्यावेळी पाचगणीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव गाडी आली, तिने त्या पाचही जणांना उडवले. पाच जणांना बोनेटवर घेत सुसाट वेगानं कार गेली. धक्कादायक म्हणजे, व्हिडीओमध्ये कारचा दरवाजा खुला दिसत आहे, त्यामुळे कारच्या आतमध्ये काय चालले होतं? की ब्रेक फेल झालं होतं? याबाबतचा पोलीस तपास करत आहेत.
अपघातानंतर कार चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण एसटी स्थानकाच्या परिसरात असलेल्या लोकांनी कार थांबवली. कार चालकाला संतप्त नागरिकांनी चोप दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेय. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असून तपास सुरू केला आहे. कारमधील लोकांची चौकशी करण्यात येत आहे. नेमकं अपघाताचे कारण जाणून घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न आहे.
वाई बस स्थानकासमोर नेहमीच गर्दी असतो. बस स्थानकाबाहेर भरधाव वेगात आलेल्या कारने पाच जणांना उडवले. या अपघातामध्ये एक जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बस स्थानकात असलेल्या एका दुकानातील कॅमेऱ्यात कैद झाली. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतले आहे.
साताऱ्यातील वाई येथे पाचगणीच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या कारने वाई बस स्थानकाच्या समोर रस्ता ओलांडणाऱ्या पाच जणांना उडवले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पळून निघालेल्या वाहन चालकाला स्थानिकांनी तात्काळ गाडी थांबवून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.