Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News: टायरची ट्युब घेऊन पोहण्यासाठी उतरले; ट्यूबवरून पडल्‍याने तलावात बुडून युवकाचा मृत्‍यू

टायरची ट्युब घेऊन पोहण्यासाठी उतरले; ट्यूबवरून पडल्‍याने तलावात बुडून युवकाचा मृत्‍यू

मंगेश कचरे

बारामती : दौंड तालुक्यातील पाटस येथे मस्तानी तलावात पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सात तास उलटूनही (Baramati) या युवकाचा मृतदेह सापडला नसुन स्थानिक ग्रामस्थांची शोध मोहीम सुरू आहे. शाहीद अन्सारी असे या बुडालेल्या युवकाचे नाव आहे. (Maharashtra News)

पुणे– सोलापूर महामार्ग लगत असलेल्या मस्तानी तलावात टायर पंचर काढणाऱ्या व्यवसायांची दोन तरुण हे मस्तानी तलावात पोहायला शिकण्यासाठी टायरची ट्युब घेऊन पोहण्यासाठी उतरले होते. तलावात काही अंतरात गेल्यावर दोघेही ट्युबवरून पाण्यात पडले. यामधील एका तरुणाला थोडेफार पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर आल्याने तो बचावला. मात्र त्याचा जोडीदार हा पाण्यात बुडाला.

सहा तासानंतरही मृतदेह सापडेना

जोडीदारांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना सांगितली. यानंतर ग्रामस्थांनी व‌ युवकांनी तत्काळ तलावात उडी टाकून त्याचा शोध घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस शिपाई टकले घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील तरुणांनी मस्तानी तलावात त्या तरुणाचा शोध घेतला. मात्र सहा तास उलटूनही मृतदेह शोधण्यात अपयश आले आहे. दरम्यान, पुणे येथील आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : सोयाबीन काढणी करताना घडले दुर्दैवी; मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update : वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन

Local Body Election : जालन्यात राजकीय भूकंप, निवडणुकीआधी महायुती तुटली, पण....

विमानाच्या खिडक्यांना छोटं छिद्रं का असतं? 99% लोकांना माहिती नसेल कारण

Diwali Lighting Vastu Tips: दिवाळीत लायटिंग लावताय? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा निवडा

SCROLL FOR NEXT