beed news  Saam tv
महाराष्ट्र

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Beed News : बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

Saam Tv

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार लहू राठोड यांनी मुलाच्या नोकरीच्या नैराश्यात केली आत्महत्या .

आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठीत लिहिला भावनिक संदेश

बंजारा समाजाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलने होत आहेत

योगेश काशिद, साम टीव्ही

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. मराठा समाजाची हैदराबाद गॅजेटची मागणी मान्य झाल्यानंतर इतर समाजाकडून नव्या मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. मराठा समाजने ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ ओबीसीत समाविष्ट असलेल्या बंजारा समाजाने एसटीतून आरक्षणाची मागणी केली आहे. एसटीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहेत. या आंदोलनादरम्यान एका बंजारा समाजातील व्यक्तीने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आयुष्य संपवलं आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी येथील लहू धोंडिबा राठोड या ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. विद्युत वायरला धरत लहू यांनी आत्महत्या केली. लहू धोंडिबा राठोड यांनी आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीत आत्महत्येचे कारणही नमूद केलं आहे.

अठराविश्व दारिद्र्य असलेल्या बंजारा समाजातील लोक पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणी करून उदरनिर्वाह भागवतात. अनेक लोक ऊसतोड करून मुलांच शिक्षण पूर्ण करत आहेत. याच समाजातील लहू धोंडिबा राठोड यांनी नैराश्यातून अचानक आयुष्य संपवलं. आरक्षणामुळे मुलाला नोकरी लागत नसल्याच्या नैराश्याने खांडवी तांडा येथील लहू धोंडिराम राठोड यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

गावकुसाबाहेर तांड्यावर राहून काबाड कष्ट करणारे लहू धोंडिबा राठोड यांनी दिवसरात्र ऊसतोडून पोरांचं शिक्षण केलं. अनेक वर्षांपासून त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षांसह पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र दिवसेंदिवस त्याला नोकरी लागणे कठीण झालं. या नैराश्यातून खचून जात लहू धोंडिबा राठोड यांनी टोकचा निर्णय घेतलाय.

'महाराष्ट्र सरकाने बंजारा समाजाला बंजारा एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले असते तर मुलाला नोकरी लागून घराची दारिद्र्य परिस्थिती कमी झाली असती. यामुळे हैद्राबाद गॅझेटरप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रर्वगातून आरक्षण देण्यात यावे,अशी चिठ्ठी लिहून ठेवत राठोड यांनी आत्महत्या केली. लहू राठोड यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Virar Dahanu Local : वलसाड एक्स्प्रेसच्या इंजिनला आग; विरार ते डहाणू लोकलसेवा ठप्प, प्रवाशांचे हाल

Pune: आमदार माऊली कटकेंच्या पत्नीचे २ ठिकाणी मतदार यादीत नाव, अशोक पवार यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT