Dhananjay Munde Saam TV News
महाराष्ट्र

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

Dhananjay Munde News : बंजारा आणि वंजारा एकच असल्याच्या धनंजय मुंडेंच्या विधानावरून मोठा वाद पेटलाय...बंजारा समाजातल्या नेत्यांनी आणि अभ्यासकांनी याला आक्षेप घेतलाय. बंजारा आणि वंजारा यांच्या नेमका काय फरक आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Suprim Maskar

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बंजारा समाजानंही याच गॅझेटीयरनुसार एल्गार पुकारला.. मात्र या आंदोलनातल्या भाषणात धनंजय मुंडेंनी बंजारा-वंजारा एकच असल्याचं केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. बंजारा समाजातील नेत्यांनी मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय.. तर दोन्ही समाज पूर्णपणे वेगळे असल्याचं बंजारा अभ्यासकांचं म्हणणंय.

वंजारा आणि बंजारा समाजात काय फरक आहे पाहूयात...

वंजारी समाज भगवान बाबांना मानतो तर बंजारा समाज संत सेवालाल महाराजांना. भगवानगड वंजारी समाजाचं शक्तीपीठ तर पोहरादेवी बंजारा समाजाचं शक्तीपीठ आहे. वंजारी समाज ग्रामीण मराठीच बोलतो तर बंजारा समाज गोरमाटी ही भाषा बोलतो. वंजारी महिला सामान्य गृहिणीसारखीच राहते. तर बंजारा महिलांची वेशभूषा विशिष्ट प्रकरची असते. वंजारी समाजात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक...तर बंजारा समाजातील बहुतांश लोक बांधकाम साईट्सवर काम करताना दिसतात.

दरम्यान हैदराबाद गॅझेटमधील माहिती देत आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी बंजारा - वंजारा एकच नसल्याचा दावा केलाय. तर बंजारा समाजाकडून तीव्र विरोध होत असल्यामुळे आता धनंजय मुंडेंनी सारवासारव करत दोन्ही समाज भटके असल्यामुळे आपण विधान केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 'माझ्या विधानाचा विपर्यास' असं आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

आता मुंडेंनी यू टर्न घेतला असला तरी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचं विधान करण्य़ामागे नेमका मुंडेंचा काय हेतू होता? ओबीसी आरक्षणातले वाटेकरी वाढत चालल्यामुळे धनगरानंतर बंजारा आणि आता वंजारींनाही एसटीत आरक्षण हवंय का? असे काही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्याचा विकास वेगाने होत आहे- एकनाथ शिंदे

Gold Rate Prediction: १ लाख २३ हजार तोळा किंमतीच्या सोन्यामध्ये आता गुंतवणूक फायद्याची की तोट्याची? तज्ज्ञांनी दिलेला सल्ला वाचा

Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण, PM नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या विमानतळाचं उद्घाटन, पाहा Inside Video

Festive Offer: सणासुदीला मोठा डिस्काउंट! Samsung Galaxy S24 5G मोबाईलवर ₹३५,००० रुपयांची सूट, पाहा नेमकी किंमत किती?

Shirpur Police : सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी; शिरपूर पोलीस ठाण्यातून पसार

SCROLL FOR NEXT