

मुंबईतील आग्रीपाडा परिसरात विदेशी महिलेची छेडछाड.
दोन आरोपींना अटक; मुख्य आरोपी बिहारमधून पकडला.
मुंबई पोलिसांची तातडीची कारवाई.
संजय गडदे, साम प्रतिनिधी
मुंबईत एका विदेशी महिलेचा पाठलाग करून तिची छेडछाड केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केलीय. यातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील आग्रीपाडा परिसरात एका पोर्तुगालच्या महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मनखुश कुमार शर्मा (वय २२) आणि गुलशन शर्मा (वय २०) या नावाच्या आरोपीना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आग्रीपाडा येथे पोर्तुगालच्या महिलेने छेडछाड झाल्याप्रकरणी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. दोन अनोळखी व्यक्ती तिचा पाठलाग करून तिची छेड काढत असल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आग्रीपाडा पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने महिलेशी संपर्क साधला. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास महालक्ष्मी रेल्वे स्थानक, धोबी घाट आणि सातरस्ता परिसरात घडल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत एका आरोपीला मुंबईतच अटक केली. तर दुसरा आरोपी होळी साजरी करण्यासाठी बिहारकडे निघाला होता. मात्र मुंबई पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत त्याला प्रवासादरम्यानच ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, विदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
छेडछाड प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुलशनकुमार नरेश शर्मा याला २८ फेब्रुवारी रोजी मलबार हिल येथील एका बांधकाम साईटवरून ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनसुखकुमार चंदकिशोर शर्मा हा त्याच्या गावी पळून गेला होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला १ मार्च रोजी बिहारमधून अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.