Actress Vannu The Great : लग्नासाठी धर्मांतर केलं, नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला; अभिनेत्री रडून रडून बेहाल

Actress Vannu The Great News : लग्नासाठी धर्मांतर करूनही नवरा संसार अर्ध्यात सोडून पळाला. त्यानंतर ही प्रसिद्ध अभिनेत्री रडून रडून बेहाल झाली.
 Vannu The Great
Actress Vannu The Great Saam tv
Published On
Summary

भोजपुरी अभिनेत्री वन्नू दी ग्रेटने अभिनेता मनी मेराजवर लग्नानंतर फसवणूक केल्याचा आरोप

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिची मांडली लोकांसमोर व्यथा

मेराज किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

भोजपुरी इंड्रस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. अभिनेत्रीने अभिनेता मेराज हा माझा नवरा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर धोका दिला. त्यानंतर संसार अर्ध्यात सोडून पळाल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.

'वन्नू दी ग्रेट'ने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपबीती सांगितली. अभिनेत्रीने दावा केला आहे की, मनी मेराजशी माझं लग्न झालं. आता मात्र नकार देत आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'मनी पुन्हा आयुष्यात ये. तुझ्या आई-वडिलांनाही सांगायचं आहे की, आम्ही आता पती-पत्नी आहोत'.

'मी लग्नाविषयीची बाब लपवून ठेवली होती. लोक बोलत होते की, हा जिहादी आहे. दुसऱ्या धर्माचा आहे. हा खरा माणूस नाही. एका दिवसात सोडेल. पण मी कोणाचं देखील ऐकलं नाही. आता देखील मी कोणाचं ऐकत नाही. , दुसऱ्या धर्माचा असल्याने सोडून देईल, असं मला बिल्कुल वाटत नाही, असे अभिनेत्रीने सांगितलं.

अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीच्या आरोपांवर मनी मेराज आणि आई-वडिलांकडून कोणताही प्रतिक्रिया समोर आलेली नाही, असेही अभिनेत्री वन्नू दी ग्रेटने सांगितलं.

 Vannu The Great
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडली; आता पोलिसांकडून आई-वडिलांचा शोध सुरु

कोण आहे मनी मेराज?

मनी मेराजने इन्स्टाग्राम रील्सवरून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर मनी मेराजने युट्युब व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मनीने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मनी मेराज सध्या त्याच्या अभिनय आणि गाण्यांतून धुमाकूळ घालत आहे. एकेकाळी चिकन विक्री करून अभिनेता उदारनिर्वाह करत होता. मात्र, भोजपुरी सिनेमाने मनीचं आयुष्य बदलून गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com