SUJAY VIKHE PATIL TOUCHES BALASAHEB THORAT’S FEET; AHMEDNAGAR BANK POLITICS saam tv
महाराष्ट्र

राजकारण जोमात! दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र; विखे थेट बाळासाहेब थोरातांच्या पाया पडले

Sujay Vikhe Patil Touches Balasaheb Thorat Feet After Meeting: अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे पाटील एकाच बैठकीत उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर विखे यांनी थोरात यांच्या पाया पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

Omkar Sonawane

सचिन बनसोडे, साम टीव्ही

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची महत्वाची बैठक संगमनेरमध्ये पार पडली. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या कट्टरविरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात आणि सुजय विखे पाटील हे या बैठकीत एकत्र आले. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील संस्थेच्या गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर सकारात्मक प्रयत्न करण्यावर बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुष्काळी परिस्थिती आणि सहकार क्षेत्रासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता निवडणुकीतील अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळून सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्याची भूमिका नेत्यांनी घेतली. जिल्हा बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावी करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, आमदार हेमंत ओगले आणि काँग्रेसचे करण ससाणे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

विशेष म्हणजे, राजकीय वैर असलेल्या विखे आणि कोल्हे यांच्यासह विविध पक्षांचे नेते एकाच बैठकीत उपस्थित राहिल्याने या बैठकीला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार मोनिका राजळे आणि माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले हे ऑनलाइन बैठकीला सहभागी झाले आणि बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या या प्रयत्नांमध्ये बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही बैठक आटोपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना हस्तांदोलन केले. तर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधील झालेल्या एका कृतीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. सुजय विखे पाटील हे थेट बाळासाहेब थोरात यांच्या पाया पडले. यावेळी थोरात यांनीही विखे यांच्या पाठीवर थाप मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon Travel : नायगावपासून हाकेच्या अंतरावर आहेत ७ सुंदर पिकनिक स्पॉट्स, फॅमिली ट्रिप करा प्लान

Vidhan Parishad Election: महायुतीनं उमेदवारी नाही दिली तर आम्ही देऊ; मंगेश चिवटेंना कोणी दिली ऑफर?

Kito Diet: कीटो डाइट सुरू केल्यावर शरीरात काय होतं? फॅट बर्निंगपासून ब्लड शुगरपर्यंत जाणून घ्या ‘हे’ बदल

Maharashtra News Live Update: संजय राऊत म्हणजे बिनडोक - गोपीचंद पडळकर

LNG Train : गुजरातमधून धावली देशातील पहिली LNG ट्रेन; वैशिष्ट्ये पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT