सचिन बनसोडे, साम टीव्ही
नगर : विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवाची अद्याप चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभवाला सामोरे जावे लागले. १९८५ पासून सलग सातवेळा संगमनेर मतदारसंघातून मताधिक्याने निवडून येणारे बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त केलं होतं. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांच्या संशयावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'फक्त माझ्याबाबत नाही, तर राज्यात अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
आज राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला. त्यानंतर लोकशाही वाचवण्याठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे, अशी साद बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना घातली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ' फक्त माझ्याबाबत नाही, तर राज्यात अनेक नेत्यांच्या बाबतीत संशयाचं वातावरण आहे. जे दिसतं ते वेगळं आहे. जे घडलं मात्र वेगळ आहे. आम्ही या बाबतीत अपील देखील केलं होतं. अनेक बंधने घातली जात आहेत. कोणी माहिती द्यायला तयार नाहीत'.
राज ठाकरे यांच्या भाषणावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, 'मला दर निवडणुकीत 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आहे. या वेळेचा निकाल अनपेक्षित होता. जनतेलाही तो अनपेक्षित वाटला, ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी उल्लेख केला आहे. फक्त माझ्याबाबती नाही, तर राज्यात अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण आहे'.
'व्हिव्हिपॅट मोजण्याची मागणी होती, मात्र ते तयार नाहीत. फक्त ईव्हीएम मशीनचे आकडे दाखवणार असल्याचे सांगितले. अनेक बंधने घातली जात असून कोणी माहिती द्यायला तयार नाहीत. ही बाब १०० टक्के संशयास्पद वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ४८ लाख मतदार वाढले, त्यावर देखील कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. मतदारांचा आकडा पाच वर्षात वाढू शकत नाही, तो तीन चार महिन्यात कसा वाढू शकतो. अनेक गोष्टी संशयास्पद आहेत. तेच भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे, असेही थोरात पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.