Raj Thackeray : ज्या शरद पवारांच्या जीवावर सगळे मोठे झाले, त्यांचे १० आमदार कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल | Video

Raj Thackeray MNS : विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या निवडून आलेल्या जागांवर शंका उपस्थित केली आहे. आज मनसेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवार यांना ४२ जागा कशा मिळाल्या? त्यांच्या ४-४ जागा येतील की नाही, असं सगळ्यांना वाटत असताना ४२ जागा निवडून येतात. कोणाचा विश्वास बसेल का यावर? असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी आज उपस्थित केला आहे. मुंबईत झालेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभा निवडणूक निकालावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेत आलेल्या अनेकांचे मला फोन आले. त्यांना देखील आश्चर्य वाटत आहे. भाजपला २०१४ मध्ये १२२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो, असंही ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ज्या शरद पवारांच्या जीवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले. जे या महाराष्ट्रात इतकी वर्ष राजकारण करत आहेत. त्या शरद पवारांना १० जागा मिळतात? या सर्व गोष्टी न समजण्याच्या पलीकडच्या आहेत. मतदानाच्या आकडेवारीवर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. केवळ ते आपल्यापर्यंत आलं नाही, हे मतदान कुठेतरी गायब झालं आहे. मग अशा प्रकारे जर निवडणूक लढवायच्या असतील तर निवडणूक न लढवलेल्या चांगलं. अर्थात कोणीही अमर पट्टा घेऊन आलेला नाही, अशा गोष्टी होत असतात, काही दिवसात ही गोष्ट संपेल, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com