School without bags : Saam tv
महाराष्ट्र

Badlapur School : बदलापूरमधील 'ती' शाळा पुन्हा सुरू, पहिल्या दिवशी 25 टक्केच विद्यार्थ्यी उपस्थित

Badlapur School Crime News : आज शनिवारपासून बदलापूर येथील ती शाळा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी २० ते २५ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे.

Satish Daud

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

अत्याचाराच्या या घटनेनंतर संबंधित शाळा बंद (School closed) ठेवण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. त्यामुळे आज शनिवारपासून ही शाळा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

आजपासून शाळेत पाचवी ते बारावीचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी २० ते २५ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. सोमवारपासून नियमितपणे सगळे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, अशी अपेक्षा विद्यार्थी तसेच पालकांना आहे. सध्या या शाळेवर प्रशासनाची करडी नजर आहे.

दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर सरकारकडून घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. एसआयटीने या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला असून त्यातून एक खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

आरोपी अक्षय शिंद याने अनेकदा चिमुकलीवर अत्याचार (Crime) केल्याचे उघड झाले आहे. अक्षय शिंदे हा सहज चिमुकल्यांपर्यत जात होता. त्याला कोणत्याही प्रकारचा अटकाव केला जात नव्हता, अशी माहिती रिपोर्टमधून उघडकीस आली आहे. 'Times Now' या वृत्त माध्यमाने या संदर्भातील रिपोर्ट समोर आणला आहे.

अक्षय शिंदे हा 15 दिवसांपूर्वी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्याच्याकडे मुलांसह मुलींचेही स्वच्छतागृह साफ करण्याचे काम देण्यात आले होते. महिला कर्मचारी नसल्याने आरोपीकडून मुलींचे स्वच्छतागृह का साफ घेतले जात होते. मात्र, चिमुकल्यांना पाहून आरोपीची नियत फिरली आणि त्याने हे गैरकृत्य केल्याचे उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT