Badlapur Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Car Accident : बदलापूरात भरधाव कार उलटली; मध्यधुंद चालकाने दिली पथदिव्याच्या खांबाला धडक

Badlapur News : बदलापूरमधील पनवेल हायवेवर हा थरारक अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे. सदरच्या अपघात एक कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले थेट पथदिव्याच्या खांबाला जाऊन धडकली

अजय दुधाने

बदलापूर : बदलापुरमध्ये भरधाव कार पथदिव्याच्या खांबाला धडकून उलटल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वेच्या पनवेल हायवेवर रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. दरम्यान कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. 

बदलापूरमधील पनवेल हायवेवर हा थरारक अपघात दुपारच्या सुमारास घडला आहे. सदरच्या अपघात एक कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट महामार्गाच्या साईडला लावण्यात आलेल्या पथदिव्याच्या खांबाला जाऊन धडकली. खांबाला धडकल्यानंतर कार उलटली. या अपघातात कारमध्ये असलेला एक जण जखमी झाला. 

चालक मद्यधुंद अवस्थेत 

अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली असता चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच अपघातग्रस्त गाडीत चायनीज खाद्यपदार्थ सांडलेले असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं. तर अपघातात कारमधील जखमी इसमाला नागरिकांनी बाहेर काढून एका रिक्षात टाकून रुग्णालयात नेण्यात आलं. तसेच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  

चालकाचा स्थानिकांशी वाद 

दरम्यान अपघातानंतर कार चालकाने स्थानिक नागरिकांशी वाद घातल्याचे समोर आले आहे. चालकासोबत स्थानिकांच्या झालेला वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अपघात झालेल्या गाडीवर पोलीस लिहिलेली पाटी असल्याचंही या व्हिडिओतून समोर आलं आहे. त्यामुळे ही गाडी नेमकी कुणाची आहे? हे तपासून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या घरात प्रणित मोरेचं कमबॅक? मिळाली मोठी हिंट

Maharashtra Live News Update: - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

SCROLL FOR NEXT