Maharashtra Legislative Council Elections, MLA Bacchu Kadu, Amravati saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu News : बच्चू कडूंनी आशा सोडली; म्हणाले, मला नाही वाटत मंत्रिमंडळ विस्तार होईल

संजय जाधव, साम टीव्ही

Bacchu Kadu News : मंत्रिमंडळ विस्तारावरुन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत आता बच्चू कडू यांनी आशा सोडली असल्याचं चित्र आहे. कारण आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं स्वत: बच्चू कडू म्हणत आहेत.

आपण लवकरच सत्तेत असणार या अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, मनसे सत्तेत येऊ शकते, त्यांचा एकच आमदार आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळाल तर नक्कीच राज ठाकरे सत्तेत येतील. पण मला नाही वाटत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.. मंत्रिमंडळाचा विस्तार आता २०२४ नंतरच होईल, असं बच्चू कडूंनी म्हटलं.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची आगामी निवडणुका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जर पुढच्या निवडणुका लढल्या तर नक्कीच बरं होईल. सत्ता संघर्षाचा निकाल, जनता आणि निवडणुका याचा कुठलाही संबंध नाही. सत्ता संघर्षाचा निकाल हा मर्यादित गोष्टींसाठी आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. (Latest Political News)

विरोधकांमध्ये सर्व अनिश्चितता

विरोधकांमध्ये सर्व अनिश्चितता आहे. आज सभा घेत आहेत पण उद्या कोण कुठे राहील हे सांगता येत नाही. गेल्या १५ दिवसात राज्यात काय सुरू आहे ते तुम्हाला माहिती आहे. सभा खूप मोठ्या होत आहेत पण नेत्यांना ते मंजूर आहे का? राहुल गांधींनी एवढी मोठी पदयात्रा काढली, खरंतर मी त्यांना मानतो परंतु काँग्रेसच्या नेत्यांना या यात्रेबद्दल काय वाटतं? असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. (Latest Marathi News)

शरद पवार-उदय सामंत भेट तिसऱ्याच कारणाने असू शकते

शरद पवार साहेबांची उद्योगमंत्री उदय सामंत हे भेट घेत आहेत. ते नेमकं कशासाठी भेटत आहेत. पवार साहेबांना महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. त्या ठिकाणी दुसरेही काही असू शकतं आणि भेट तिसऱ्याच कारणाने असू शकते. काही राजकीय भूकंपही असू शकतो किंवा कोकणातील शेतकऱ्यांसाठी काही नवीन योजना असू शकते, अशा शक्यताही त्यांनी बोलूल दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT